दरोडेखोरांना अटक

By Admin | Updated: February 27, 2016 23:38 IST2016-02-27T23:30:41+5:302016-02-27T23:38:27+5:30

श्रीगोंदा : आढळगाव व वडाळी येथे श्रीगोंदा पोलिसांनी सकाळी छापे टाकून तीन सराईत दरोडेखोरांना अटक केली.

Daughters arrested | दरोडेखोरांना अटक

दरोडेखोरांना अटक

श्रीगोंदा : आढळगाव व वडाळी येथे श्रीगोंदा पोलिसांनी सकाळी छापे टाकून तीन सराईत दरोडेखोरांना अटक केली.
पाथर्डी व कर्जत तालुक्यात दरोडे टाकणारा पाथर्डी येथील पोलीस कोठडीचे गज कापून फरार झालेल्या रमेश विलास भोसले (रा. रुई) हा आढळगाव शिवारात नातेवाईकांकडे असल्याची खबर पोलीस निरीक्षक शामकांत सोमवंशी यांना मिळाल्यानंतर शनिवारी सकाळी पो. हे. कॉ. अंकुश ढवळे, अविनाश ढेरे, बंडू बहीर, संजय दुधाडे, प्रकाश वाघ, भगवान शिंदे व महिला पोलीस बजंगे, गोफणे यांनी आढळगाव शिवारात छापा टाकून रमेश भोसले याला ताब्यात घेतले. त्याच्यावर पाथर्डी व कर्जत पोलिसांत दरोडे, जबरी चोरी, खून असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
या पोलीस पथकाने वडाळी शिवारात छापा टाकून धीरज रोहिदास भोसले व अभिनंदन रोहिदास भोसले (रा.श्रीगोंदा) यांना सापळा लावून अटक केली, श्रीगोंदा पोलिसांनी सराईत गुन्हेगारांच्या विरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे.
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Daughters arrested