शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात दिव्याखाली अंधार

By admin | Updated: October 29, 2014 23:57 IST

अकोले: तालुक्यात पवन ऊर्जा निर्मितीने बाळसे धरले असले तरी भारनियमनाचे सावट अद्याप कायम आहे.

अकोले: तालुक्यात पवन ऊर्जा निर्मितीने बाळसे धरले असले तरी भारनियमनाचे सावट अद्याप कायम आहे. अकोलेच्या वायव्य पट्ट्यातील ङोंगरमाथ्यावरील ‘विंडविल’ प्रकल्पातून ५० मेगावॅट वीज मिळत असली तरी आढळा खोऱ्यातील अंधार मात्र दूर झालेला नाही. शिवाय आदिवासी भागातील बेरोजगारांना या प्रकल्पाकडून असलेली रोजगाराची अपेक्षाही फोल ठरली आहे. सध्या तालुक्यात खिरविरे-कोंभाळणे, नायकरवाडी-पागिरवाडी मुथाळणेच्या डोंगरमाथ्यावर पवन ऊर्जा प्रकल्पाचे खांब उभारले गेले आहेत. यातून १०० मेगावॅट वीज निर्माण होणे अपेक्षित आहे. यात पहिल्या टप्प्याच्या ५० मेगावॅट वीज निर्मितीस सुरुवात झाली आहे. एका खासगी वीज निर्मिती कंपनीचे हे पंखे आहेत. कंपनीने तलवार कानडी समाजाच्या शेतकऱ्यांकडून अवघ्या एकरी १ लाख ३० हजार रुपये किमतीने या माळरान जमिनी तीन-चार वर्षांपूर्वी खरेदी केल्या. तसेच कंपनीत ‘कामाला घेऊ’ असे तोंडी आश्वासन दिले होते. मात्र ते फोल ठरले. दरम्यान, तालुक्यातील वीज टंचाई कायम असून ग्रामीण भागात आजही चार ते सहा तास भारनियमन असते. विंडविल परिसरातील बेरोजगारांना अपेक्षित रोजगार उपलब्ध झाला नसल्याचे बोलले जात आहे. (तालुका प्रतिनिधी) अकोल्याच्या वायव्य पट्ट्यातील डोंगरमाथ्यावर ‘विंडविल’चा ५० मेगावॅट वीजनिर्मितीचा प्रकल्प आहे.