दहिगाव बोलका आरोग्य केंद्राची लसीकरणात दि्वतीय क्रमांकावर झेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:24 IST2021-09-06T04:24:47+5:302021-09-06T04:24:47+5:30

प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १८ ते ४४ वयोगटातील १३ हजार ५४० लाभार्थी असून ४५ वयोगटावरील ९ हजार ६४५ लाभार्थी आहेत. ...

Dahigaon Bolka Health Center ranks second in vaccination | दहिगाव बोलका आरोग्य केंद्राची लसीकरणात दि्वतीय क्रमांकावर झेप

दहिगाव बोलका आरोग्य केंद्राची लसीकरणात दि्वतीय क्रमांकावर झेप

प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १८ ते ४४ वयोगटातील १३ हजार ५४० लाभार्थी असून ४५ वयोगटावरील ९ हजार ६४५ लाभार्थी आहेत. येथील आरोग्य केंद्राने पहिल्या डोसचे ६ हजार ७३५ लाभार्थ्यांना लसीकरण केले असून त्यात ५६ आरोग्य कर्मचारी, ३२३ फ्रंटलाईन वर्कर्स, १८ ते ४४ वयोगटातील २ हजार ४११, तर ४५ वर्षांवरील ३ हजार ९४५ लाभार्थ्यांचा सहभाग आहे. दुसऱ्या डोसचा ३ हजार ३६ लोकांनी लाभ घेतला आहे. त्यात ११९ आरोग्य कर्मचारी, १५९ फ्रंटलाईन वर्कर्स, १८ ते ४४ वयोगटातील ७२, तर ४५ वर्षांवरील २ हजार ६३६ लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

यासाठी आर. डी. इंदे, एस. आर. आहेर, बी. के. परमाल, सी. वाय. जगधने, एस. बी. भिंगारदिवे, एच. बी. परदेशी, केणे, ए. एस. बनसोडे, डी. के. राठोड, रईस शेख, देवकर यांची मेहनत असल्याचे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे व डॉ. प्रज्ञा भगत यांनी सांगितले.

..............

लसीकरणाचा वेग वाढला

प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असणाऱ्या सर्व गावांत सध्या लसीकरण शिबिरांचे आयोजन केले जात असल्याने लसीकरणाचा वेग वाढला आहे.

...........

केद्रांतर्गत समाविष्ट गावे...

- दहिगाव बोलका, तळेगाव मळे, लौकी, कासली, गोधेगाव, घोयेगाव, आपेगाव, तिळवणी, उक्कडगाव, पढेगाव, शिरसगाव, सावळगाव, ओगदी, करंजी, बोलकी, खिर्डीगणेश, आंचलगाव.

Web Title: Dahigaon Bolka Health Center ranks second in vaccination