श्रीगोंद्याला ९ एप्रिलनंतर कुकडीचे आवर्तन; ९ पर्यंत कर्जतलाच आवर्तन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 14:32 IST2020-04-05T14:31:27+5:302020-04-05T14:32:03+5:30
कुकडीचे आवर्तन कर्जत तालुक्यासाठी ९ एप्रिलपर्यत चालू ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर श्रीगोंदा तालुक्याचे आवर्तन सुरू करण्यात येईल, अशी माहिती कुकडीचे कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे यांनी शनिवारी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

श्रीगोंद्याला ९ एप्रिलनंतर कुकडीचे आवर्तन; ९ पर्यंत कर्जतलाच आवर्तन
श्रीगोंदा : कुकडीचे आवर्तन कर्जत तालुक्यासाठी ९ एप्रिलपर्यत चालू ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर श्रीगोंदा तालुक्याचे आवर्तन सुरू करण्यात येईल, अशी माहिती कुकडीचे कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे यांनी शनिवारी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
चार दिवसापूर्वी येडगाव कालव्याचा दरवाजा नादुरुस्त झाला होता. त्यामुळे काही तास वाया गेले. कुकडी जोड कालवा किलोमीटर १३२ साठी दोन दिवसात विसापूरमधून ७० क्युसेकने पाणी काढण्यात येईल. त्यानंतर यामध्ये १३० क्युसेकने कुकडी कालव्यातून पाणी सोडले जाईल. कोरोना संचारबंदी लागू असल्याने डिझेल पंप बंद असतात. त्यामुळे गाड्यांना वेळेवर डिझेल उपलब्ध होत नाही. त्यामुळे नियोजन करताना थोडीशी अडचण होत आहे. पण कुकडीचे आवर्तन सर्व शेतकºयांचे भरणी झाल्याशिवाय बंद होणार नाही, असेही काळे यांनी सांगितले.