पारनेरमध्ये नारायण राणेंविरोधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:24 IST2021-08-26T04:24:14+5:302021-08-26T04:24:14+5:30

पारनेर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात राज्यभरातील शिवसैनिकांमध्ये संताप व्यक्त होत ...

Crime against Narayan Rane in Parner | पारनेरमध्ये नारायण राणेंविरोधात गुन्हा

पारनेरमध्ये नारायण राणेंविरोधात गुन्हा

पारनेर :

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात राज्यभरातील शिवसैनिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. आता पारनेर येथेही शिवसेनेचे तालुका प्रमुख विकास रोहोकले यांनी बुधवारी दुपारी पोलीस ठाण्यात राणे यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली.

शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर, उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले, तालुकाप्रमुख विकास रोहोकले, पंचायत समितीचे सदस्य डॉ. श्रीकांत पठारे, अनिकेत औटी, विजय डोळ, नीलेश खोडदे आदी आदी उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी यावेळी राणे यांच्या वक्तव्याचा निषेध केला. त्यानंतर ठाणे अंमलदारांकडे फिर्याद दाखल केली. शिवसेनेवर आगपाखड करून वाटेल ते बरळणाऱ्याला आजपर्यंत शिवसैनिकांनी कधीही माफ केलेेले नाही. आजही करणार नाहीत, असे कोरगावकर यावेळी म्हणाले.

Web Title: Crime against Narayan Rane in Parner