कोविड सेंटर रिकामेच, खासगी रुग्णालये फुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:19 IST2021-04-19T04:19:09+5:302021-04-19T04:19:09+5:30

------------ लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : जिल्ह्यात खासगी रुग्णालये हाऊसफुल्ल असली तरी कोविड सेंटर मात्र रिकामीच आहेत. सौम्य लक्षणे ...

Covid Center empty, private hospitals full | कोविड सेंटर रिकामेच, खासगी रुग्णालये फुल्ल

कोविड सेंटर रिकामेच, खासगी रुग्णालये फुल्ल

------------

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : जिल्ह्यात खासगी रुग्णालये हाऊसफुल्ल असली तरी कोविड सेंटर मात्र रिकामीच आहेत. सौम्य लक्षणे असणारेदेखील रुग्णालयात किंवा घरातच क्वारंटाइन झाल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे ऑक्सिजन बेडसाठी धावाधाव सुरू आहे. जिल्ह्यात १८ हजार नागरिक सक्रिय असून त्यापैकी ९ ते १० हजार रुग्ण खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असून उर्वरित रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. नगर शहरात सहा कोविड सेंटर असून तेथे दोनशेच्या आसपास बेड रिकामेच असल्याचे दिसते आहे. कोविड सेंटरकडे पाठ फिरवणारे रुग्ण होम आयसोलेशनमध्ये असून त्यांचा कुटुंबीयांशी व समाजाशी येणारा संपर्क कोरोनावाढीला पोषक ठरत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात होम आयसोलेशन बंद करण्यात आले आहे.

जिल्ह्यामध्ये १८ हजारांच्या वर रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी केवळ पाच ते सहा हजार रुग्ण खासगी रुग्णालये आणि कोविड सेंटरमध्ये दाखल आहेत. १२ हजारांपेक्षा अधिक रुग्ण होम आयसोलेशनमध्येच आहेत. याच रुग्णांकडून कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर फैलावत असल्याचे दिसते आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी व कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रत्येक तालुक्यात कोविड सेंटर उभारण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.

--------

कोविड बेड

एकूण बेड -१९२९६

रिकामे बेड -६८१६

ऑक्सिजन बेड -३२१४

रिकामे ऑक्सिजन बेड -३५७

-----------

कोविड केअर सेंटर व बेड

एकूण सेंटर-७६

ग्रामीण-६०

शहर-१६

-----------

एकूण बेड -९१३०

नगर शहर-१५८०

उर्वरित जिल्हा-७५५०

--------------

३) कोविड केअरमध्ये ५० टक्के बेड रिकामे

नगर शहरामध्ये १६ कोविड सेंटर आहेत. तेथे १५८० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र या सेंटरमध्ये ५० टक्के बेड रिकामेच आहेत. आता होम आयसोलेशन बंद झाल्याने यापुढील काळात कोविड केअर सेंटरमध्ये भरती करण्याबाबत कार्यवाही सुरू होणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.

-----------

४) खासगी रुग्णालयात बेडच शिल्लक नाहीत

कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या शहरातील एका रुग्णालयात पाहणी केली असता अनेक रुग्णांना सौम्य लक्षणे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तरीही काळजीपोटी त्यांच्या नातेवाइकांनी त्यांना दाखल केलेले आहे. गंभीर रुग्णांची संख्या १० ते १५ टक्केच आहे. इतर रुग्ण पाच ते दहा दिवसांच्या आतच बरे होत आहेत. मात्र त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत.

-------------

नेट फोटो

बेड

१७ हॉस्पिटल ॲण्ड कोविड सेंटर डमी

कोविड-१९

टेस्ट

Web Title: Covid Center empty, private hospitals full

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.