यावेळी पंचायत समिती सदस्य जिजाबापू शिंदे, शंकर पाडळे, रंगनाथ पंधरकर, ॲड. बाळासाहेब काकडे, वैभव पाचपुते, शांताराम भोयटे, बाळासाहेब पाचपुते उपस्थित होते. मगर पुढे म्हणाले की, शिवाजीराव नागवडे यांनी तीनवेळा राजेंद्र नागवडे यांना कारखान्याचे अध्यक्ष केले; परंतु शिवाजीराव नागवडे यांच्या निधनानंतर राजेंद्र नागवडे यांनी कारखान्यात एकाधिकारशाही सुरू केली. सह वीज निर्मिती प्रकल्प वेळेवर सुरू केला नाही. त्यामुळे शासनाने ८० लाखांची अनामत रक्कम जप्त केली. परवानगी घेतली नाही म्हणून पर्यावरण विभागाने ७० लाखांचा दंड केला. त्यामुळे प्रकल्प बंद आहे. दररोज १५ लाखांचा तोटा होत आहे. याला जबाबदार कोण? असा सवाल मगर यांनी केला.
शिक्षण संस्थेत पैसे घेऊन शिक्षक भरती केली. त्यामुळे दर्जा खालावला आहे. यंदा नागवडे साखर कारखाना ४४ कोटी तोट्यात जाण्याची भीती निर्माण झाली आहे, असे ते म्हणाले.
आण्णासाहेब शेलार म्हणाले की, राजेंद्र नागवडे यांनी परभणीला खाजगी कारखाना घेतला. त्यामुळे त्यांचा पाचपुतेंच्या खासगीकरणावर बोलण्याचा अधिकार संपला आहे. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दीपक भोसले म्हणाले की, नागवडे काँग्रेस पक्षात आहेत. मात्र, साखर कारखान्यात ते अपयशी ठरले. सहकारात विरोध करण्याची भूमिका घेतली आहे. सहकार आणि पक्षीय राजकारणाचा संबंध नाही.
------------उपाध्यक्ष आणि बंडाचे निशाण
नागवडे साखर कारखाना राजसत्तेत नेहमीच दुखावलेल्या उपाध्यक्षांनी अध्यक्षांच्या विरोधात बंड करण्याची परंपरा आहे. बबनराव पाचपुते कारखान्याचे अध्यक्ष असताना प्रा. तुकाराम दरेकर, जिजाबापू शिंदे यांनी बंड केले. त्यानंतर स्व. शिवाजीराव नागवडे अध्यक्ष असताना भगवानराव पाचपुते, ज्ञानदेव हिरवे, बाबासाहेब इथापे यांनी बंड केले. आता केशव मगर यांनी राजेंद्र नागवडे यांच्या विरोधात बंड केले आहेत. त्यामुळे उपाध्यक्षांच्या बंडाचा शिलशिला कायम आहे.
-------फोटो - २३केशव मगर