शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

महामंडळाने विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:34 IST

राज्यात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २५ सप्टेंबर २०१६ ला स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त माथाडी कामगारांच्या मेळाव्यात अण्णासाहेब ...

राज्यात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २५ सप्टेंबर २०१६ ला स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त माथाडी कामगारांच्या मेळाव्यात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकरिता २०० कोटी रुपयांचा भरीव निधी देण्याची घोषणा केली होती. राज्यांमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या मागणीवरून २०१७ मध्ये मराठा समाजाकरिता अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ नवीन तीन योजनांची घोषणा करून भरघोस आर्थिक मदतीची तरतूद केली. त्या अनुषंगाने नागपूर अधिवेशनात २०१६-१७ मध्ये २०० कोटी रुपये व २०१७-१८ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये २०० कोटी रुपये अशी ४०० कोटी रुपयांची भरघोस निधीची तरतूद करण्यात आली होती. त्या रकमेतील १०० कोटी रुपये महामंडळास वर्ग करावेत, अशी मागणी महामंडळाने शासनाकडे केली. त्यानुसार २०१९ मध्ये ७० कोटी रुपये निधी महामंडळाला शासनाकडून वर्ग करण्यात आला. राज्यामध्ये महामंडळाच्या योजनेंतर्गत २१ हजार ७३१ लाभार्थ्यांना बँकांकडून कर्ज वाटप करण्यात आले आहे.त्या नुसार महामंडळाकडून लाभार्थ्यांना ८९ कोटी ८५ लाख रुपयांचा व्याज परतावा करण्यात आलेला आहे.

महामंडळामार्फत विविध योजनांचा लाभ घेत असताना ५ वर्षे मुदत आहे. ती ७ वर्षे करणे आणि ज्यांनी योजनेतून लाभार्थ्यांचे कर्ज घेतलेले आहे व त्यांची परत दोन वर्षे नियमितपणे लाभार्थ्यांनी केली आहे, त्यांना उद्योग वाढवण्यासाठी वाढीव कर्ज घेता येईल असाही महामंडळाचा प्रयत्न करावा. अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

....................

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना या योजनेतून कर्ज द्यावे

मराठा समाजातील विद्यार्थांचे शैक्षणिक कर्ज हे कै.अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत देण्यात यावे.

माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी कै.अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष असताना संपूर्ण महाराष्ट्रातील तालुके दौरे करून २०,००० मराठा उद्योजक तयार केले आहेत. भविष्यकाळात एक लाख मराठा उद्योजक तयार करण्यासाठी नरेंद्र पाटील यांची पुन्हा अध्यक्षपदी निवड करण्याचीही मागणी करण्यात आली.