निंबळक : कोरोना काळात अहोरात्र सेवा देणाऱ्या विविध क्षेत्रांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा कोरोना योद्धा पुरस्काराने संभाजीराजे ग्रुपच्या वतीने देहरे (ता. नगर) येथे सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम स्वातंत्र्यदिनी पार पडला.
दीड वर्षापासून कोरोना रुग्णांची सेवा करणारे वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, आरोग्य सेविका, लॅब, रुग्णवाहिका चालक, सफाई कर्मचारी, महसूल, महावितरण, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी, पाणीपुरवठा,
स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांना कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दहावी, बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही सन्मान संभाजीराजे ग्रुपच्या वतीने करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात वृक्षारोपणाने झाली. सांगता रक्तदान शिबिराने झाली.
यावेळी पं. स. सदस्य व्ही. डी. काळे, सरपंच हिराबाई करंडे, सेवा सोसायटी दिलीप करंडे, संभाजीराजे ग्रुपचे अध्यक्ष स्वप्निल लांडगे, दीपक दरे, डॉ. कल्पना पोहरे, जयश्री किरण लांडगे, शीतल चोर, शंकर कटारे, डॉ. मंदार भोसले, संतोष काळे, चंद्रकांत खजिनदार, अजित काळे, साजित शेख, राम पिंपळे, कैलास डावरे, लक्ष्मण ढसाळ, हरिदास करंडे, ज्ञानेश्वर लांडगे, यशवंत काळे, सुभाष वाघ, प्रवीण करंडे, राजेंद्र लांडगे, भानुदास भगत, नितीन भांबळ, मेघनाथ धनवटे, रमेश जेठे, अमोल काळे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. सुहास पाखरे यांनी केले. महेश काळे यांनी आभार मानले.
-----
१७ देहरे
देहरे येथे स्वातंत्र्यदिनी रक्तदान शिबिर पार पडले.