पिंपळगाव माळवी येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:16 IST2021-07-15T04:16:00+5:302021-07-15T04:16:00+5:30

पिंपळगाव माळवी : नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथे जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत लसीकरणाची तिसरी फेरी घेण्यात आली. यावेळी ९० ...

Corona preventive vaccination at Pimpalgaon Malvi | पिंपळगाव माळवी येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण

पिंपळगाव माळवी येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण

पिंपळगाव माळवी : नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथे जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत लसीकरणाची तिसरी फेरी घेण्यात आली. यावेळी ९० व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले. पंचेचाळीस वयोगटापुढील प्रत्येकी पन्नास व्यक्तींना पहिला डोस व चाळीस व्यक्तींना दुसरा डोस यावेळी देण्यात आला. लसीकरणासाठी गावातील नागरिकांनी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. परंतु, ग्रामपंचायत प्रशासनाने टोकन पद्धती वापरल्यामुळे गोंधळ झाला नाही. गावच्या लोकसंख्येच्या प्रमाणात लसीचे डोस अत्यल्प प्रमाणात उपलब्ध होत असून, अजूनही बरेचसे नागरिक लसीकरणापासून वंचित आहेत. त्यामुळे जास्त प्रमाणात लस उपलब्ध करण्याची मागणी यावेळी ग्रामस्थांनी आरोग्य विभागाकडे केली. या लसीकरणासाठी जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. पी.ए. आंधळे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. एल. एस. सानप, आरोग्यसेविका आर. एस. साळवे, व्ही. आर. धाडगे, व्ही. बी. सिसवाल, आशासेविका शोभा ठाणगे, उषा डाडर, लता झिने, मनीषा बनकर, स्वाती झिने, ग्रामसेवक दत्तात्रय शेळके यांनी परिश्रम घेतले.

140721\img_20210713_174633.jpg

पिंपळगाव माळवी येथे लसीकरण करताना वैद्यकीय अधिकारी डॉ. पी.ए. आंधळे व आरोग्य कर्मचारी

Web Title: Corona preventive vaccination at Pimpalgaon Malvi