अहमदनगर : जिल्ह्यात गुुरुवारी २७८ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्हयातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता ७५ हजार २५१ इतकी झाली आहे. बाधितांची संख्या वाढल्याने सक्रिय रुग्णांची संख्या एक हजाराच्यावर गेली आहे. गुरुवारी एकाचाही मृत्यू झाला नसल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेने सांगितले.
गुुरुवारी जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ११७, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १२७ आणि अँटिजेन चाचणीत ३४ रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये नगर शहर (७४), अकोले (८), जामखेड (१९), कर्जत (११), नगर ग्रामीण (१५), पारनेर (२३), पाथर्डी (३), राहाता (३१), संगमनेर (२०), श्रीरामपूर( १०), मिलिटरी हॉस्पिटल (१), इतर जिल्हा (४), कोपरगाव (६), नेवासा (५), पाथर्डी (२), राहुरी (३), संगमनेर (३३), श्रीगोंदा (६), श्रीरामपूर (४) येथील रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात गुरुवारी १६८ रुग्णांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७३ हजार १११ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.१६ टक्के इतके झाले आहे.
--------------
कोरोनाची स्थिती
बरे झालेली रुग्णसंख्या : ७३१११
उपचार सुरू असलेले रूग्ण : १००६
मृत्यू : ११३४
एकूण रुग्णसंख्या : ७५२५१