शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनापाठोपाठ आता झिका व्हायरसचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:16 IST

अहमदनगर : राज्यात कोरोनासोबतच झिका व्हायरसचाही धोका वाढताना दिसत आहे. यापासून बचावाच्या दृष्टिकोनातून आरोग्य विभागाने नगर जिल्ह्यात फवारणीचे निर्देश ...

अहमदनगर : राज्यात कोरोनासोबतच झिका व्हायरसचाही धोका वाढताना दिसत आहे. यापासून बचावाच्या दृष्टिकोनातून आरोग्य विभागाने नगर जिल्ह्यात फवारणीचे निर्देश दिले आहेत. नागरिकांनीही आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

कोविडच्या तिसऱ्या लाटेचा धोका राज्यात वर्तविला जात आहे. त्यात पावसाळा असल्याने आता डासांचा प्रादुर्भावदेखील वाढला आहे. डासांपासून झिका हा विषाणूजन्य आजार बळावला आहे. सध्या या विषाणूचे १३ रुग्ण केरळमध्ये आढळले असल्याने पुन्हा एकदा धोक्याची घंटा वाजली आहे. त्याअनुषंगाने आरोग्य विभागाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील डबक्यांमध्ये फवारणी करणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने आरोग्य विभागातर्फे जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेला फवारणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

---------

कशामुळे होतो?

झिका व्हायरसचा आजार हा डेंग्यूप्रमाणेच डासांपासून होतो. डास चावल्यानंतर झिका आजाराची लागण होते. त्यामुळे डासांपासून स्वत:चे संरक्षण करणे हाच एकमेव उपाय असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

----------

झिका व्हायरसची लक्षणे काय?

झिकाची लक्षणे साधारण डेंग्यू आजारासारखीच आहेत.

यात ताप येणे, अंगावर लाल रंगाचे डाग.

डोळे येणे, सांधे व स्नायूदुखी.

थकवा आणि डोकेदुखी.

---------------

उपाययोजना काय?

सध्या झिका व्हायरसवर कोणतीही लस किंवा ठोस उपचार नाहीत. झिका व्हायरस आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर गंभीर परिणाम करताे. अशा परिस्थितीत स्वत:ची रोगप्रतिकार शक्ती चांगली ठेवणे आणि डास वाढू न देणे आ‌‌वश्यक आहे.

---------------

डेंग्यूप्रमाणेच झिका व्हायरसदेखील डासांपासूनच पसरतो. त्या अनुषंगाने सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा रुग्णालय या ठिकाणी ताप, डेंग्यू ताप, चिकुनगुण्या आजाराची औषधे उपलब्ध आहेत. इतरही आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.

- डाॅ. दादासाहेब साळुंके, जिल्हा हिवताप अधिकारी