शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

आहारावर नियंत्रण महत्त्वाचे-डॉ.गोपाळ बहुरूपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 17:11 IST

योग्य आहार, व्यायाम आणि योग-प्राणायाम नियमित असेल, तर मधुमेहाला पळवून लावू शकतो. शरीरातील सर्वच अवयवांवर परिणाम करणारा हा आजार आहे. शरीरातील वाढणारी साखर डोक्याच्या केसांपासून ते पायाच्या नखांपर्यंत मधुमेहाच्या रुपाने दुष्परिणाम करते. रोज नित्य एक तास चालण्याने मधुमेह बरा होऊ शकतो, असा विश्वास डॉ. गोपाळ बहुरुपी यांनी व्यक्त केला.

जागतिक मधुमेह नियंत्रण दिन विशेष  अहमदनगर : मधुमेहाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. घरामध्ये कोणाला मधुमेह नाही, म्हणजे तो आपल्याला होणार नाही, असे मुळीच नाही. योग्य आहार, व्यायाम आणि योग-प्राणायाम नियमित असेल, तर मधुमेहाला पळवून लावू शकतो. शरीरातील सर्वच अवयवांवर परिणाम करणारा हा आजार आहे. शरीरातील वाढणारी साखर डोक्याच्या केसांपासून ते पायाच्या नखांपर्यंत मधुमेहाच्या रुपाने दुष्परिणाम करते. रोज नित्य एक तास चालण्याने मधुमेह बरा होऊ शकतो, असा विश्वास डॉ. गोपाळ बहुरुपी यांनी व्यक्त केला. जागतिक मधुमेह नियंत्रण दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मधुमेहाचा आजार आणि काळजी घेण्याचा सल्ला दिला.मधुमेहाचा आजार कधी होतो? व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा, वार्धक्य, स्वादुुपिंडाचे आजार, थॉयराईडचे आजार आदी कारणांनी हा आजार होतो. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले, की स्वादुपिंडाचे संप्रेरक इन्शुलिन याचे कमी प्रमाणात स्त्रवन झाल्यामुळे शरीरातील, रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. उपाशीपोटी ८० ते १०० आणि जेवणानंतर १२०-१८० असे रक्तातील साखरेचे प्रमाण सामान्य असते. मधुमेह तीन टप्प्यांमध्ये होतो.मधुमेहाची लक्षणे कोणती?कामात उत्साह न वाटणे, कमी श्रम केल्यानंतरही वारंवार थकवा जाणवणे, लघवीला वारंवार व अतिप्रमाणात होणे, लघवीला विशिष्ट प्रकारचा मधुगंध येणे, तोंडाला वारंवार दोड पाणी, लाळ आल्यासारखे वाटणे, तहान वारंवार लागणे ही व यासारखी मधुमेहाची लक्षणे रुग्णांमध्ये आढळून येतात.मधुमेहाचे नियंत्रण कसे करायचे?मधुमेह हा पूर्णपणे बरा न होणारा, परंतु औषधोपचार व व्यायामाने नियंत्रित होणारा आजार किंवा व्याधी आहे. औषधौपचाराद्वारे, व्यायामाद्वारे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करता येते. मधुमेहाला नियंत्रणात आणण्यासाठी फक्त चार गोष्टींची आवश्यकता आहे. १) आहार नियंत्रण, २) नियमित औषधोपचार, ३) व्यायाम, ४) डॉक्टरांचा सल्ला व तपासणी. एकाचवेळी भरपूर आहार घेण्यापेक्षा थोड्याथोड्या प्रमाणात आहार घ्यावा. चालणे, योगासने, प्राणायाम, सूर्यनमस्कार, रोज एक तास नियमित चालावे. जेवणानंतर वज्रासनात बसावे. नियमित व्यायामामुळे केवळ मधुमेहावरच नव्हे, तर सर्वच आजारांवर योग्य परिणाम होतो. याशिवाय डॉक्टरांकडून वारंवार तपासणी करून घेणे गरजेचे आहे.

टॅग्स :doctorडॉक्टरdiabetesमधुमेह