विद्यार्थ्यांना गुणसंपन्न बनविण्यात शिक्षकांचे योगदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:26 IST2021-09-08T04:26:17+5:302021-09-08T04:26:17+5:30
स्कूलचे मुख्य कार्यवाहक संदीप कोयटे म्हणाले, समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये कोरोना काळातही प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागातील शिक्षकांनी केंद्र ...

विद्यार्थ्यांना गुणसंपन्न बनविण्यात शिक्षकांचे योगदान
स्कूलचे मुख्य कार्यवाहक संदीप कोयटे म्हणाले, समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये कोरोना काळातही प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागातील शिक्षकांनी केंद्र व राज्य सरकारच्या निर्णयानुसार ऑनलाइन शिक्षणाचे धडे देत एक तात्पुरती पर्यायी व्यवस्था स्वीकारली होती. कोणत्याही परिस्थितीत समता स्कूलमधील शिक्षक व शिक्षकाचे महत्त्व कमी होऊ दिले नाही. त्यामुळे आधुनिक शिक्षणाच्या आधारे प्रत्यक्ष शिक्षणाचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वाचे काम समताचे शिक्षक करीत होते. त्यामुळे समताच्या प्रत्येक विद्यार्थ्याने समताच्या प्रत्येक शिक्षकांना सदैव स्मरणात ठेवून त्यांचा यथायोग्य आदरातिथ्य एका दिवसासाठी नाही, तर सदैव केले पाहिजे.
सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार विद्यार्थी कुलदीप कोयटे, रक्षा दोषी, सिद्धांत जोशी, अन्वय बारहाते यांनी केले. कोपरगाव नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा सुहासिनी कोयटे, शैक्षणिक संचालिका लिसा बर्धन, उपप्राचार्य समीर आत्तार यांची उपस्थिती होती.
070921\teachers day.jpg
फोटो०७ - समता शिक्षक दिन - कोपरगाव