शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
8
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
9
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
10
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
11
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
12
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
13
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
14
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
15
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
16
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
17
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
18
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
19
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
20
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस महासंचालकांसह मुख्य सचिवांविरोधात अवमान याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:16 IST

याप्रकरणी संगमनेर तालुक्यातील तिगाव येथील भास्कर कारभारी गायकवाड यांनी ॲड. सुरेंद्र जानराव यांच्यामार्फत संगमनेर जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली ...

याप्रकरणी संगमनेर तालुक्यातील तिगाव येथील भास्कर कारभारी गायकवाड यांनी ॲड. सुरेंद्र जानराव यांच्यामार्फत संगमनेर जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती. जिल्हा न्यायाधीश (क्र. २) भोसले यांच्यासमोर या याचिकेची सुनावणी झाली.

याचिकाकर्ते यांची तिगाव येथे वडिलोपार्जित शेतजमीन व जनावरे आहेत. ते नोकरीनिमित्त पुणे येथे राहतात. नोकरी सांभाळून ते गावाकडील शेती करतात. शेजारी राहणाऱ्या लोकांनी गायकवाड यांच्या शेतीवर कब्जा केल्याच्या प्रकरणात संगमनेर न्यायालयात दिवाणी दावा सुरू आहे. या जमिनीतील गायकवाड यांचा हिस्सा वगळून इतर मिळकतीबाबत हा दावा सुरू आहे. गायकवाड यांनी त्यांच्या हिश्श्याच्या जमिनीत जनावरांसाठी मका पेरला होता. ज्यांच्या विरोधात दावा सुरू आहे, त्या लोकांनी गायकवाड यांच्या शेतातील मका कापून नेला. याबाबत गायकवाड हे संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले. मात्र, त्यांची तक्रार दाखल करून घेतली नाही. त्यानंतर गायकवाड यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनाही निवेदन देऊन दाद मागितली. मात्र, कुणीच त्यांची दखल घेतली नाही. त्यानंतर गायकवाड यांनी ॲड. जानराव यांच्यामार्फत संगमनेर न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेतील प्रतिवादींना नोटीस काढताना न्यायालयाने सुप्रीम कोर्टाने दिलेल्या विविध निकालांचा संदर्भ दिला असल्याचे याचिकाकर्त्यांचे वकील ॲड. जानराव यांनी सांगितले.

----------------------------

कुठल्याही तक्रारदाराची फिर्याद दाखल करून घ्यावी, असे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत. याचिकाकर्ते भास्कर गायकवाड यांच्या शेतातील पीक चोरीबाबत मात्र पोलिसांनी फिर्याद दाखल करून न घेतल्याने त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर न्यायालयाने राज्याचे तत्कालीन पोलीस महासंचालक, राज्याचे मुख्य सचिव, अहमदनगरचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व इतरांविरोधात अवमान याचिका दाखल करून घेत त्यांना नोटीस काढली आहे.

- ॲड. सुरेंद्र जानराव, याचिकाकर्त्याचे वकील