सर्व घटकांना बरोबर घेऊ जाणार काँग्रेस पक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:19 IST2021-02-08T04:19:29+5:302021-02-08T04:19:29+5:30
जामखेड : देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करणारा काँग्रेस पक्ष असून, तो एक विचार आहे. या पक्षात जातीयता नसून, सर्व ...

सर्व घटकांना बरोबर घेऊ जाणार काँग्रेस पक्ष
जामखेड : देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करणारा काँग्रेस पक्ष असून, तो एक विचार आहे. या पक्षात जातीयता नसून, सर्व घटकांना बरोबर घेऊन जाणारा मानवतावादी पक्ष आहे, असे प्रतिपादन आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी केले.
जामखेड शहारामध्ये काँग्रेस बळकटीकरण सप्ताहानिमित्त युवक काँग्रेसनाच्या ‘चलो वार्ड’ अभिनयाच्या प्रारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा काँग्रेसचे समन्वयक ज्ञानदेव वाफारे, जिल्हा सरचिटणीस माणिकराव मोरे, युवक काँग्रेसचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष राहुल उगले, शहर काँग्रेसचे अध्यक्ष देवीदास भादलकर, जिल्हा सचिव सुनील शिंदे, अल्पसंख्याक काँग्रेस अध्यक्ष फिरोज पठाण, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष शिवराजे घुमरे, नवनिर्वाचित काँग्रेस जिल्हा सचिव जमीर सय्यद, तालुका उपाध्यक्ष कुंडल राळेभात, विद्यार्थी काँग्रेस तालुकाध्यक्ष बळीराम पवार, अनिकेत जाधव, अनिल अडाले, उमेश माळवदकर आदी उपस्थित होते.