अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 11:00 IST2025-05-20T10:59:35+5:302025-05-20T11:00:03+5:30

Chhagan Bhujbal Oath ceremony: छगन भुजबळ हे मंगळवारी मंत्रिपदाची शपथ घेतील असे सोमवारी सायंकाळी सांगण्यात आले. मुंडे यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा खाते होते. तेच खाते भुजबळ यांच्याकडे दिले जाईल.

Chhagan Bhujbal Oath ceremony: Ajit Pawar came, gave a bouquet and joined hands; Chhagan Bhujbal finally became a minister, took oath | अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 

अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नाराज असलेले नेते छगन भुजबळ यांनी अखेर आज मंत्रिपदाची शपथ घेतली. एका छोटेखानी शपथविधी सोहळ्यात राजभवनात भुजबळ यांना राज्यपालांनी शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्रीअजित पवार आणि एकनाथ शिंदे उपस्थित होते. 

छगन भुजबळ हे मंगळवारी मंत्रिपदाची शपथ घेतील असे सोमवारी सायंकाळी सांगण्यात आले. मुंडे यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा खाते होते. तेच खाते भुजबळ यांच्याकडे दिले जाईल. राज्यात भाजप-शिंदेसेना आणि अजित पवार गटाचे सरकार आल्यानंतर डिसेंबर २०२४ मध्ये झालेल्या विस्तारावेळी भुजबळ यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली नव्हती. तेव्हापासून ते नाराज होते. आपली नाराजी त्यांनी अनेकदा बोलून दाखविली होती. बीडमधील घटनाक्रमाच्या नंतर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला तेव्हापासूनच भुजबळ यांना पुन्हा मंत्रिपद दिले जाणार अशी चर्चा होती, ती अखेर खरी ठरली.

भुजबळ यांनी मध्यंतरी अजित पवार यांच्यावर टीकाही केली होती. मात्र नंतर चर्चा केल्यानंतर भुजबळ शांत राहिले होते. भुजबळ हे अजित पवार गटातील एक मोठा ओबीसी चेहरा मानले जातात. धनंजय मुंडे यांच्या जागी आता भुजबळ मंत्री होणार असल्याने पक्षातील इतर इच्छुकांच्या आशेवर पाणी फिरले आहे.

सात दिवसांपूर्वीच कळविला होता निर्णय
उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे आणि ज्येष्ठ नेते खा. प्रफुल्ल पटेल यांच्यात सात दिवसांपूर्वीच भुजबळ यांना पुन्हा मंत्री करण्याबाबत चर्चा व निर्णय झाला. त्यानंतर तो भुजबळ यांना कळविण्यात आला, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.

Web Title: Chhagan Bhujbal Oath ceremony: Ajit Pawar came, gave a bouquet and joined hands; Chhagan Bhujbal finally became a minister, took oath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.