शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
2
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
3
Top Marathi News Live: मुंबई: मरीन ड्राईव्हवर मोठा अपघात, बाईकने एकाला उडवलं, तिघांचा मृत्यू
4
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
5
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
6
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
7
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
8
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
9
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
10
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
11
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
12
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
13
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
14
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
15
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
16
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
17
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
18
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
19
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
20
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
Daily Top 2Weekly Top 5

नगर तालुक्यात काँग्रेस आघाडीत ‘धुसफूस’

By admin | Updated: September 19, 2014 23:38 IST

अहमदनगर : नगर पंचायत समिती सभापती निवडीमुळे नगर तालुक्यात काँग्रेस आघाडीत चांगलीच धुसफूस पेटली

अहमदनगर : नगर पंचायत समिती सभापती निवडीमुळे नगर तालुक्यात काँग्रेस आघाडीत चांगलीच धुसफूस पेटली आहे. ज्यांना सभापतीसाठी नीट अर्ज भरता येत नाही ते नगर तालुक्याचे राजकारण करायला निघाले. स्वत:च्या अपयशाचे खापर आमच्यावर फोडण्यापेक्षा उमेदवारी अर्ज नीट भरायला शिका, असा टोला राष्ट्रवादीचे नगर पंचायत समिती सदस्य गोविंद मोकाटे यांना राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष माधवराव लामखडे व जि.प. सदस्य बाळासाहेब हराळ यांनी लगावला. मोकाटे यांचा बोलविता धनी कोण? असा सवालही लामखडे-हराळ यांनी केला.नुकत्याच झालेल्या नगर पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती निवडीत काँग्रेस आघाडीच्या सदस्यामध्ये फाटाफूट झाली. काँग्रेसचे दोन, राष्ट्रवादीचे एक सदस्य उघडपणे महायुतीच्या गोटात दाखल झाल्याने नगर पंचायत समितीवर युतीचे वर्चस्व निर्माण झाले. सभापतीपदासाठी काँग्रेस आघाडीकडून उतरलेले गोविंद मोकाटे हे या निवडीत एकाकी पडले. काँग्रेस आघाडीच्या फाटाफुटीस मोकाटे यांनी लामखडे व हराळ यांना जबाबदार धरून त्यांच्यावर टिकास्त्र सोडले होते.यानंतर लामखडे व हराळ यांनी या टिकेला उत्तर देताना म्हटले, सभापतीपदासाठी काँग्रेस आघाडीकडून अर्ज दाखल केला होता. मात्र अर्जाबरोबर जात प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांच्या सभापतीपदाचा अर्ज बाद केला. त्यामुळे मी निवडणुकीमधून माघार घेतली असे मोकाटे यांचे म्हणणे धादांत खोटे आहे. त्यांना स्वत:चा उमेदवारी अर्ज नीट भरता येत नाही. त्यांनी स्वत:च्या चुकाचे पाप दुसऱ्याच्या माथी मारू नये. नगर तालुक्यात विकासाच्या मुद्यावर व तालुक्याच्या अस्तित्वासाठी वेगवेगळ्या विचाराचे लोक एकत्र आल्याने मोकाटे सैरभैर झाले आहेत. त्यांनी आघाडीत विनाकारण भांडणे लावून ऐन विधानसभेच्या तोंडावर आघाडीची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न चालू केला आहे.(तालुका प्रतिनिधी)