शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

‘महाकरंडक’ साठी रंगीत तालीम

By admin | Updated: January 12, 2016 23:34 IST

अहमदनगर : महाराष्ट्रातील सर्वांत मोठी एकांकिका स्पर्धा म्हणून गौरविलेल्या ‘अहमदनगर महाकरंडक’ एकांकिका स्पर्धेला यंदा राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे़

अहमदनगर : महाराष्ट्रातील सर्वांत मोठी एकांकिका स्पर्धा म्हणून गौरविलेल्या ‘अहमदनगर महाकरंडक’ एकांकिका स्पर्धेला यंदा राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे़ प्राथमिक फेरीत तब्बल ८५ एकांकिकांचे सादरीकरण झाले़ २ ते १० जानेवारी दरम्यान पुणे, मुंबई, सांगली, नाशिक व औरंगाबाद केंद्रावर प्राथमिक फेरी घेण्यात आली़ प्राथमिक फेरीचा मंगळवारी निकाल जाहीर करण्यात येणार असून, अंतिम फेरीसाठी २५ एकांकिका निवडल्या जाणार आहेत़ सोमवारी नगर येथे झालेल्या फेरीत १८ संघांनी एकांकिकांचे सादरीकरण केले़ आता अंतिम फेरीसाठी कोणत्या एकांकिका निवडल्या जाणार, याकडे कलाकारांचे लक्ष लागून आहे़ स्पर्धेच्या अंतिम फेरीला नगर शहरात २१ जानेवारीपासून प्रारंभ होत आहे़ यंदा या स्पर्धेचे आयोजन पूर्णत: डिजिटल पद्धतीने करण्यात आले आहे़ ‘रंगभूमीची रणभूमी’अशी टॅग लाईन असलेल्या या स्पर्धेच्या माध्यमातून नगरच्या नाट्यक्षेत्राचे चांगलेच ग्लॅमर वाढले आहे़ यंदा या स्पर्धेत स्थानिक कलारांनाही मोठी संधी मिळणार आहे़ या स्पर्धेत एकूण ३ लाख रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत़ त्यामुळे महाकरंडक स्पर्धेतील सहभागासाठी राज्यभरातील संघांनी चांगलीच तयारी केली आहे़ महाकरंडक एकांकिका स्पर्धेचे हे चौथे वर्ष आहे. अनुष्का मोशन पिक्चर्स अँण्ड एंटरटेन्मेंट व महावीर प्रतिष्ठानद्वारे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. उत्साह अन् उत्कंठा अहमदनगर महाकरंडक एकांकिका स्पर्धा अल्पावधीतच राज्यात लोकप्रिय झाली आहे़ अंतिम फेरीसाठी ८५ पैकी २५ एकांकिका निवडल्या जाणार आहेत़ आता यामध्ये कुणाला संधी मिळते, याची उत्कंठा कलाकारांना लागून आहे़ या स्पर्धेत दर्जेदार सादरीकरण करत बक्षीस मिळवायचे, हा उत्साहही सोमवारी सप्तक सदन येथे प्राथमिक फेरीदरम्यान दिसून आला़ (प्रतिनिधी)