शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सैनिक कार्यालयाची बंद वेबसाईट होणार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:27 IST

अहमदनगर : माजी सैनिकांच्या विविध कल्याणकारी कामांसाठी उपयुक्त असलेली राज्य सैनिक कल्याण कार्यालयाची वेबसाईट गेल्या अनेक दिवसांपासून बंद होती. ...

अहमदनगर : माजी सैनिकांच्या विविध कल्याणकारी कामांसाठी उपयुक्त असलेली राज्य सैनिक कल्याण कार्यालयाची वेबसाईट गेल्या अनेक दिवसांपासून बंद होती. परंतु भारतीय प्रहार सैनिक संघटनेने दोन दिवस केलेल्या आमरण उपोषणाच्या दणक्यानंतर संबंधित प्रशासनाने ही वेबसाईट त्वरित सुरू करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे माजी सैनिकांची गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेली कामे सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

माजी सैनिकांची विविध कल्याणकारी कामे करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सैनिक कल्याण कार्यालय व त्यांच्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय असते. त्यामार्फत जिल्ह्यात माजी सैनिक, देशासाठी कामी आलेल्या जवानांच्या वीर माता-पिता-नारींची विविध कामे होतात. अपंग, वृद्ध माजी सैनिक व त्यांच्या वारसांना या कामासाठी खूप मोठ्या अंतरावरून अनेकदा हेलपाटे मारावे लागत होते. त्यामुळे शासनाने एक शासकीय वेबसाईट राज्य सैनिक कार्यालयासाठी दिली होती. या वेबसाईटवरून माजी सैनिक आपली सैनिक कल्याण सुविधांची कामे व शासकीय योजनांची माहिती घरबसल्या करु शकत होते. परंतु सैनिकांसाठी जीवनदायी असणारी ही वेबसाईट गेली चार वर्षांपासून कार्यालयाने मुद्दामहून बंद केली होती. यावर अनेकांनी निवेदने व स्मरणपत्रे देऊन ही वेबसाईट सुरू करण्याची मागणी केली. परंतु त्याची दखल घेतली गेली नाही. दरम्यान, राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या कार्याने प्रेरित होऊन स्थापन झालेल्या भारतीय प्रहार सैनिक संघटनेने याकामी पाठपुरावा केला. ही वेबसाईट १५ ॲागस्ट २०२१ पर्यंत सुरू न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा प्रहार संघटनेने दिला होता. दरम्यान, ही वेबसाईट वेळेत सुरू न झाल्याने प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी ही वेबसाईट काही तांत्रिक अडचणींमुळे १ नोव्हेंबर २०२१ पर्यंत कार्यान्वित करण्याचे लेखी आश्वासन संबंधितांनी दिले. त्यानंतर संघटनेने पाणी पिऊन आमरण उपोषण थांबवले.

यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विनोदसिंग परदेशी, ॲड. संजय शिरसाठ, भाऊसाहेब जाधव, बी. जी. पाचरणे, ज्ञानदेव देवखिळे, बुढाण शेख, दत्तू वाखारे, बाळासाहेब शेवाळे, राम लांडे, गोरख खेडकर, बुआजी खेडकर, शेळके, परशुराम शिंदे, बबन फलके, महाजन, पाथारे, भामे मामा आदी उपस्थित होते.

--------------

दरम्यान, या उपोषण वेळी संघटनेच्या एक बाब निदर्शनास आली की काही तोतये माजी सैनिक राज्य सैनिक कल्याण कार्यालयाचे एजंट असून ते माजी सैनिकांची बाजू न घेता सैनिक कार्यालयाच्या बाजूने तोतयेगिरी करत होते. या तोतयेगिरी माजी सैनिकांचे संबंधित अधिकाऱ्यांशी संगनमत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. त्यामुळे माजी सैनिक कोणत्याही संघटनेत काम करत असोत, वेळ प्रसंगी सैनिक कल्याण विषयी एकतेची वज्रमूठ बांधणे काळाची गरज असल्याचे प्रहार सैनिक संघटनेचे अध्यक्ष परदेशी यांनी सांगितले.

-----------

फोटो -१७प्रहार

राज्य सैनिक कल्याण कार्यालयाची वेबसाईट गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्याने भारतीय प्रहार सैनिक संघटनेने राज्य सैनिक कल्याण कार्यालयासमोर उपोषण केले.