शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

बाळ बोठे विनयभंगाच्या गुन्ह्यात वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:20 IST

अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठे याला गुरुवारी पारनेर न्यायालयाने विनयभंगाच्या ...

अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठे याला गुरुवारी पारनेर न्यायालयाने विनयभंगाच्या गुन्ह्यात वर्ग केले. न्यायालयाबाहेर हजर असलेल्या कोतवाली पोलिसांनी बोठेला तत्काळ ताब्यात घेतले.

हत्येच्या घटनेनंतर तीन महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपी बाळ बोठेला १३ मार्च रोजी पोलिसांनी हैदराबाद येथून अटक केली. पारनेर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला प्रथम सातनंतर तीन व दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. दरम्यान, कोठडीची मुदत संपत असल्याने पोलिसांनी गुरुवारी (दि. २५) त्याला पारनेर न्यायालयासमोर हजर केले. प्रथम वर्ग न्यायाधीश उमा बोऱ्हाडे यांनी बोठे याला न्यायालयीन कोठडी सुनावली. तसेच त्याला विनयभंगाच्या गुन्ह्यात वर्ग केले.

रेखा जरे यांच्या हत्येनंतर बाळ बोठे फरार असताना त्याच्याविरोधात नगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. बोठे याला अटक झाल्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक राकेश मानगावकर यांनी आरोपीला वर्ग करण्यासाठी पारनेर न्यायालयात अर्ज केला होता. गुरुवारी दुपारी आरोपी बोठेला ताब्यात घेण्यासाठी कोतवाली पोलिसांचा मोठा फौजफाटा पारनेर न्यायालयाबाहेर हजर होता.

दरम्यान बोठेला नगर जिल्हा न्यायालयात शुक्रवारी हजर करणार असल्याची माहिती कोतवालीचे निरीक्षक मानगावकर यांनी दिली. त्यामुळे आता बोठेच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे.