मुलांना दुकानदाराला दाखवावा लागणार वयाचा पुरावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:27 IST2021-08-18T04:27:30+5:302021-08-18T04:27:30+5:30

अहमदनगर : जिल्ह्यात आता १८ वर्षे वयाच्या आतील मुलांना अद्याप लसीकरण सुरू न झाल्याने त्यांना बाजारात खरेदीसाठी जायचे असल्यास ...

Children will have to show proof of age to the shopkeeper | मुलांना दुकानदाराला दाखवावा लागणार वयाचा पुरावा

मुलांना दुकानदाराला दाखवावा लागणार वयाचा पुरावा

अहमदनगर : जिल्ह्यात आता १८ वर्षे वयाच्या आतील मुलांना अद्याप लसीकरण सुरू न झाल्याने त्यांना बाजारात खरेदीसाठी जायचे असल्यास त्यांच्या वयाचा पुरावा दुकानदारांना दाखवावा लागणार आहे. याशिवाय शॉपिंग मॉल्स, दुकानांमधील कर्मचाऱ्यांनी दोन्ही डोस घेतलेले असावेत, तसेच त्याला १४ दिवस पूर्ण झालेले असावेत, अशा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिला आहे.

‘ब्रेक द चेन’अंतर्गत जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी याबाबतचा आदेश मंगळवारी दिला आहे. या आदेशात म्हटले आहे की, रात्री दहापर्यंत दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, शॉपिंग मॉलमध्ये काम करणाऱ्या सर्व व्यवस्थापन, कर्मचारी आणि प्रवेश करणाऱ्या सर्व नागरिकांचेही कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण झालेल्या असाव्यात. तसेच दुसरी मात्रा घेऊन १४ दिवस पूर्ण झालेले असावेत. नागरिकांनाही हीच अट लागू राहणार आहे. दुकानदारांनी लसीकरण झाल्याबाबतचे प्रमाणपत्र त्यांच्या फोटोसह ओळखपत्र दुकानाच्या प्रवेशद्वारावर लावणे आवश्यक राहणार आहे. मुला - मुलींना माॅलमध्ये प्रवेश देताना त्यांच्या वयाचा उल्लेख असलेला शासकीय दस्तऐवज ज्यामध्ये पॅनकार्ड, शाळा, महाविद्यालयातील प्रमाणपत्र दुकानाच्या प्रवेशद्वारावर दाखविणे आवश्यक राहणार आहे.

Web Title: Children will have to show proof of age to the shopkeeper