तांदळे टोळीविरोधात मोक्काअंतर्गत दोषारोपपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:16 IST2021-06-25T04:16:34+5:302021-06-25T04:16:34+5:30

नयन राजेंद्र तांदळे (वय २५, रा. भिस्तबाग चौक, नगर), विठ्ठल भाऊराव साळवे (वय २७, रा. झापवाडी ता. नेवासा), अक्षय ...

Chargesheet under Mocca against the rice gang | तांदळे टोळीविरोधात मोक्काअंतर्गत दोषारोपपत्र

तांदळे टोळीविरोधात मोक्काअंतर्गत दोषारोपपत्र

नयन राजेंद्र तांदळे (वय २५, रा. भिस्तबाग चौक, नगर), विठ्ठल भाऊराव साळवे (वय २७, रा. झापवाडी ता. नेवासा), अक्षय बाबासाहेब ठोंबरे (वय २३, रा. प्रेमदान, सावेडी), शाहुल अशोक पवार (वय ३१), अमोल छगन पोटे (वय २८, दोघे रा. सुपा, ता. पारनेर) असे मोक्काअंतर्गत दोषारोपपत्र दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

गुन्ह्याचे तपास अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी या टोळीविरोधात दोषारोपपत्र दाखल केले आहे. सुपा (ता. पारनेर) पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यात आरोपींविरुद्ध मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. या सर्व आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. तांदळे व त्याच्या टोळीतील सदस्यांविरोधात सुपा पोलीस ठाण्यासह नगर शहरातील तोफखाना व कोतवाली पोलीस ठाण्यात दरोडा, दरोड्याची तयारी, जबरी चोरी, लुटमार, शस्त्राचा धाक दाखवून लुटमार आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

Web Title: Chargesheet under Mocca against the rice gang