शहरं
Join us  
Trending Stories
1
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
2
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
3
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
4
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
5
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
6
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
7
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
8
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
9
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
10
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
11
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
12
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
13
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
14
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
15
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
16
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
17
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
18
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
19
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
20
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
Daily Top 2Weekly Top 5

छिंदमविरोधात दोषारोपपत्र दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:16 IST

अहमदनगर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेला महापालिकेतील बडतर्फ उपमहापौर श्रीपाद छिंदम याच्याविरोधात सोमवारी ...

अहमदनगर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेला महापालिकेतील बडतर्फ उपमहापौर श्रीपाद छिंदम याच्याविरोधात सोमवारी जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असल्याचे तपासी अधिकारी किरण सुरसे यांनी सांगितले.

६० पानांचे हे दोषारोपपत्र असून यात सहा साक्षीदारांचा समावेश आहे. फेब्रुवारी २०१८ मध्ये फोनवरील संभाषणादरम्यान छिंदम याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. याबाबत शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून छिंदम याच्याविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा सहायक निरीक्षक किरण सुरसे यांनी तपास केला. गुन्हा दाखल झाला तेव्हा छिंदम हा महापालिकेत उपमहापौर पदावर होता. शासकीय लोकसेवक पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचे दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी गृहविभागाची परवानगी घ्यावी लागते. याबाबत तपासी अधिकारी सुरसे यांनी गृहविभागाला पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला. गृहविभागाचे उपसचिव संजय खेडेकर यांची परवानगी मिळाल्यानंतर हे दोषारोपपत्र सोमवारी दाखल करण्यात आले आहे.

---------------------

आवाजाचा नमुना ठरणार महत्त्वाचा पुरावा

छिंदम याच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप आणि छिंदम याच्या आवाजाचा नमुना नाशिक येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविला होता. क्लिपमधील आवाज आणि छिंदमच्या आवाजात समानता असल्याचा अहवाल प्रयोगशाळेने पोलिसांना दिला आहे. त्यामुळे खटल्यात हा तांत्रिक पुरावा महत्त्वाचा ठरणार आहे.