शहरं
Join us  
Trending Stories
1
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
2
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
3
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
4
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
5
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
6
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
7
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
8
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
9
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
10
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
11
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
12
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
13
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
14
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
15
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
16
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
17
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
18
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
19
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
20
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
Daily Top 2Weekly Top 5

साईनगरीतील शतकोत्तरी गुरू पौर्णिमा उत्सवास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:14 IST

मिरवणूक द्वारकामाई मंदिरात आल्यानंतर तेथे श्रीसाईसच्चरित ग्रंथाचा प्रथमाध्याय वाचून बगाटे यांनी पारायणाचा शुभारंभ केला. यानंतर डेप्युटी सीईओ रवींद्र ठाकरे, ...

मिरवणूक द्वारकामाई मंदिरात आल्यानंतर तेथे श्रीसाईसच्चरित ग्रंथाचा प्रथमाध्याय वाचून बगाटे यांनी पारायणाचा शुभारंभ केला. यानंतर डेप्युटी सीईओ रवींद्र ठाकरे, मुख्यलेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, कार्यकारी अभियंता संजय जोरी व संरक्षणप्रमुख अण्णासाहेब परदेशी यांनी अनुक्रमे दोन ते पाच अध्यायांचे वाचन केले. उत्सवानिमित्त सकाळी सीईओ कान्हुराज बगाटे व संगीता बगाटे यांच्या हस्ते समाधी मंदिरात पाद्यपूजा करण्यात आली. दुपारी माध्यान्ह आरती, तर सायंकाळी चार ते सहा वाजेदरम्यान मंदिर कर्मचारी संभाजी तुरकणे यांचे कीर्तन झाले. रात्री समाधी मंदिरात शेजारती झाली. द्वारकामाई मंदिर मात्र पारायणासाठी आतील बाजूने रात्रभर खुले ठेवण्यात आले. उत्सवाच्या प्रथमदिनी होणारा पालखी सोहळा व मुख्यदिनी शुक्रवारी रात्री होणारी रथ मिरवणूक कोरोनामुळे रद्द करण्यात आली आहे.

यंदाच्या उत्सवात अमेरिका येथील साईभक्त शुभा पाई यांच्या देणगीतून मंदिर व परिसरात फुलांची आकर्षक सजावट व सुनील बाराहाते, साई समर्थ इलेक्ट्रिकल, शिर्डी यांनी मंदिर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई केली. शुक्रवारी उत्सवाच्या मुख्य दिवशी काकड आरतीनंतर द्वारकामाईतील अखंड पारायणाची सांगता होऊन प्रतिमा व साईसच्चरित ग्रंथाची मिरवणूक काढण्यात येईल. दुपारी माध्यान्ह, सायंकाळी धुपारती, तर रात्री शेजारती होईल. दुपारी मंदिरात कीर्तनाचा कार्यक्रम होईल.

.................

भाविकांनी घेतले कळसाचे दर्शन

कोरोनामुळे गुरू पौर्णिमा उत्सव भक्तांविना साजरा झाला. या उत्सवाला दूरवरून आलेल्या शेकडो भाविकांनी कळसाचे दर्शन घेऊन हजेरी लावली.