शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
4
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
5
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
6
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
7
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
8
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
9
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
10
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
11
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
12
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
13
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
14
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
15
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
16
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
17
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
18
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
19
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
20
Marathi News LIVE: पेट्रोल आणि डिझेल कमी वापरा, खाद्यतेलाचा वापर कमी करा, ऑनलाइन शिक्षण सुरू करा; PM मोदींचे सलग दुसऱ्या आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर सीसीटीव्हीची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:17 IST

अहमदनगर : शहर व परिसरात शंभरहून अधिक ठिकाणी उघड्यावर कचरा टाकला जात आहे. शहरात ज्या ठिकाणी कचऱ्याचे ढिग साचलेले ...

अहमदनगर : शहर व परिसरात शंभरहून अधिक ठिकाणी उघड्यावर कचरा टाकला जात आहे. शहरात ज्या ठिकाणी कचऱ्याचे ढिग साचलेले आहेत, अशा परिसरात सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कचरा टाकणाऱ्यांवर आता सीसीटीव्हीची नजर असणार आहे.

महापालिकेने स्वच्छ भारत अभियानांतर्गत गतवर्ष कंटेनरमुक्त शहर केले हाेते. याशिवाय शहरात ३५३ ठिकाणी सर्रास कचरा टकाला जात होता. हा परिसरही पालिकेच्या आरोग्य विभागाने स्व्च्छ केला होता. मात्र नागरिकांनी पुन्हा रस्त्यावर, ओढ्या -नाल्यांच्या कडेला कचरा टाकण्या सुरुवात केली आहे. घरोघरी कचरा संकलन करण्यासाठी महापालिकेने घंटा गाडीची व्यवस्था केलेली आहे. असे असताना नागरिक रस्त्यावर कचरा टाकत आहेत. महापालिकेने स्वच्छ भारत अभियान २०२१ ची तयारी सुरू केली आहे. शहरातील कचरा कुंड्यांचा माहिती आरोग्य विभागाकडून घेण्यात आली आहे. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार शहरासह उपनगरात १०० ठिकाणी पुन्हा कचरा कुंड्या साचलेल्या आहेत. नागरिकांना वेळोवेळी सांगून सर्रास रस्त्यावर कचरा टाकला जात असल्याने आरोग्य विभागाने सीसीटीव्ही बसविण्याचा प्रस्ताव आयुक्तांना सादर केला आहे. त्यास मंजूरी देण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात ५० ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत.

महापालिकेने कचरा साठविण्यासाठी ११० कंटनेर ठेवले होते. हे कंटेनर आरोग्य विभागाने उचलून घेतल्याने रस्त्यावर कचरा टाकण्याचे प्रमाण कमी झाले हाेते. मात्र पुन्हा रस्त्यावर कचरा ढिग साचू लागले आहेत. त्यामुळे शहर व परिसरात पुन्हा दर्गंधी निर्माण झाली असून, रस्त्यावर कचरा टाकणार्यांकडून प्रत्येकी ५०० रुपये दंड अकारण्यात येणार आहे. महापालिेकेने स्वच्छतेसाठी कडक पाऊल उचलले असून, स्वच्छता निरीक्षकांकडून पुढील आढवड्यात त्याची अंमलबजावणी केली जाईल.

...

ओला व सुका कचरा वेगळा करणार

महापालिकेने घर ते घर कचरा संकलानासाठी ठेकेदाराची नियुक्ती केलेली आहे. ओला व सुका कचरा करण्याचा आदेश आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी दिला. ओला व सुका कचरा संकलन करण्यासाठी वेळा निश्चित केल्या जाणार आहेत. त्यानुसार एक दिवस ओला व दुसर्या दिवशी सूका, असे कचरा संकलानाचे नियोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

..

मनपा कर्मचाऱ्यांना ॲप डाऊनलोड करणे बंधनकारक

स्वच्छ सर्वेक्षणात नागिरकांचा प्रतितसाद किती आहे, यावर पालिकेला गुण मिळतात. त्यामुळे हे ॲप डाऊनलोड करण्यासाठीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. महापालिकेत दोन हजार कर्मचारी कार्यरत आहेत. कर्मचार्यांना स्वच्छतेचे ॲप डाऊनलोड करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

...