संजय राऊत यांच्यावर नगरमध्ये गुन्हा दाखल, नेमके प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2024 09:11 IST2024-05-18T09:10:17+5:302024-05-18T09:11:17+5:30
खासदार संजय राऊत यांच्यावर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

संजय राऊत यांच्यावर नगरमध्ये गुन्हा दाखल, नेमके प्रकरण काय?
अहमदनगर : औरंगजेबाच्या जन्मस्थळाचा दाखल देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रचारसभा दरम्यान केलेल्या भाषणात एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी उद्धवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्यावर कोतवाली पोलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस हेड कॉन्स्टेबल अतुल काजळे यांनी याबाबत शुक्रवारी फिर्याद दिली.
महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ शहरातील क्लेराब्रुस मैदानावर ८ मे रोजी सायंकाळी सभा झाली हाेती. या सभेत राऊत यांनी औरंगाजेबाच्या जन्मस्थळाचा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. त्यावेळी त्यांनी मोदी यांचा एकेरी उल्लेख केला होता. यासंदर्भात ॲड. मनोज जैस्वाल यांच्यासह इतरांनी निवडणूक शाखेकडे तक्रार केली केली होती. या तक्रारीची दखल घेऊन जिल्हा निवडणूक शाखेकडून राऊत यांच्यावरील कारवाईबाबत येथील कोतवाली पोलिसांना प्रस्ताव दिला होता. त्यानुसार राऊत यांच्यावर भादंवि कलम १७१ (क), ५०६ व लोकप्रतिनिधी अधिनियम कलम १२३ (३) नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.