विहिरीसाठी पाटपाण्याच्या दाखल्याची अट रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:15 IST2021-07-15T04:15:59+5:302021-07-15T04:15:59+5:30

केडगाव : म. ग्रा. रो. ह. योजनेअंतर्गत नगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विहिरीसाठी येणाऱ्या प्रस्तावातील पाटपाण्याच्या दाखल्याची अट रद्द करण्याची मागणी ...

Cancel the condition of flooding certificate for wells | विहिरीसाठी पाटपाण्याच्या दाखल्याची अट रद्द करा

विहिरीसाठी पाटपाण्याच्या दाखल्याची अट रद्द करा

केडगाव : म. ग्रा. रो. ह. योजनेअंतर्गत नगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विहिरीसाठी येणाऱ्या प्रस्तावातील पाटपाण्याच्या दाखल्याची अट रद्द करण्याची मागणी पंचायत समितीच्या सभापती सुरेखा गुंड व उपसभापती डॉ. दिलीप पवार यांनी केली आहे.

याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनामध्ये नगर तालुक्यातील शेतकऱ्यांना विहिरींच्या प्रकरणासाठी पाटपाणी नाही, असा दाखला मागितला जातो. हा दाखला लघु पाटबंधारे विभागाकडून घ्यावा लागतो. नगरच्या शेतकऱ्यांना पाटपाणी नसल्याबाबतचा दाखला श्रीगोंदा येथून मिळतो.

वास्तविक पाहता नगर तालुक्यात कोठेही पाटपाणी योजना अस्तित्वात नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना हा दाखला मिळविण्यासाठी विनाकारण आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. याबाबीचा विचार करून सिंचन विहिरीच्या प्रकरणासाठी पाटपाणी नाही. या दाखल्याची अट रद्द करण्याची मागणी सभापती सुरेखा गुंड व उपसभापती डॉ. दिलीप पवार यांनी केली आहे.

----

बहुतांश गावात सिंचन विहिरींचा मार्ग मोकळा

नगर तालुक्यातील जवळपास १०० गावे अतिशोषित क्षेत्रातून सुरक्षित क्षेत्रात आले आहेत. तालुक्यातील बहुतांशी गावातील शेतकऱ्यांचा सिंचन विहिरींचा मार्ग मोकळा झाला. परंतु, जाचक अटीमुळे शेतकऱ्यांना विहिरीच्या प्रकरणात त्रास सहन करावा लागत आहे. अतिशोषित क्षेत्रामधून सुरक्षित क्षेत्रात आलेल्या गावातील शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.

Web Title: Cancel the condition of flooding certificate for wells