शहरं
Join us  
Trending Stories
1
इराकची जगाला मोठी 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच...
2
Top Marathi News LIVE: प. बंगालमध्ये निकालानंतर हिंसाचार थांबेना, जमावाने लेनिनचा पुतळा तोडला...
3
Punjab Blast: पंजाब हादरलं! ३ तासांत २ मोठे धमाके; अमृतसर आणि जालंधरमध्ये नेमकं काय घडलं? वाचा संपूर्ण टाइमलाईन
4
पश्चिम बंगालचा निकाल येताच अखिलेश यादव यांचा मोठा निर्णय; समाजवादी पार्टीने IPAC सोबतची डील केली रद्द
5
दिवाळखोर होण्याचं संकट टळलं! कंपनीला क्लिन चीट, शेअरला २०%चं अपर सर्किट; ३० दिवसांत ३३% ची वाढ
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' ४ मुलांकांच्या स्त्रिया साक्षात लक्ष्मीचं रूप; घरात आणतात अपार सुख-समृद्धी
7
विजय यांच्या टीव्हीकेला पाठिंबा द्या, अन्यथा..., ३० आमदारांचा इशारा, तामिळनाडूत अण्णा द्रमुक फुटीच्या उंबरठ्यावर?
8
मुंबई विमानतळावर ७ मे रोजी ६ तासांचा 'ब्लॉक'; धावपट्टीच्या देखभालीसाठी विमान सेवा राहणार बंद
9
Sanju Samson: संजू सॅमसन सुसाट! डेव्हिड वॉर्नरचा रेकॉर्ड मोडला, एबी डिव्हिलियर्सचा विक्रम धोक्यात
10
अजबच! एकाच आईच्या जुळ्या मुली, पण दोघींचेही वडील वेगवेगळे; DNA रिपोर्टमधून खळबळजनक खुलासा
11
अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? 
12
कोकणात उद्धवसेनेला आणखी एक धक्का बसणार, सनसनाटी विजय मिळवणारा नेता शिंदेसेनेच्या वाटेवर
13
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
14
क्रूरतेचा कळस! सरकारी नोकरीसाठी बायकोनेच केला नवऱ्याचा 'गेम'; दिली १ लाखाची सुपारी
15
घरमालकाची बायको होती कॉलेज फ्रेंड, अनैतिक संबंधाचा संशय; तिसऱ्या मजल्यावरून 'ते' दोघे पडले कसे?
16
NDA मध्ये शिक्षक असल्याचा केला होता दावा; डॉ. संतोष गोयल यांना लष्कराचे जवान घेऊन गेले, मिलिट्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
17
शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षेची सक्ती; मराठी अभ्यास केंद्र अन् मनसेनं केला विरोध
18
Rohit Pawar : "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले
19
संजू सॅमसनची फलंदाजी 'सुपरहिट'; पण शरीराचा आकार पाहून दिग्गज म्हणाला- ही तर चिंतेची बाब!
20
Astro Tips: शनिदेवाची कृपादृष्टी आपल्यावर होते तेव्हा मिळतात 'हे' संकेत; तुम्ही अनुभवलेत का?
Daily Top 2Weekly Top 5

बसस्थानकात येणाऱ्या-जाणाऱ्या बसला खासगी वाहनांमुळे अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:25 IST

संगमनेर : संगमनेर बसस्थानकात पार्किंगची सोय उपलब्ध आहे. मात्र, तरीही मोठ्या संख्येने वाहन चालक त्यांची दुचाकी, चारचाकी वाहने बसस्थानकाच्या ...

संगमनेर : संगमनेर बसस्थानकात पार्किंगची सोय उपलब्ध आहे. मात्र, तरीही मोठ्या संख्येने वाहन चालक त्यांची दुचाकी, चारचाकी वाहने बसस्थानकाच्या आवारात, प्रवेशद्वारासमोरचच उभी करतात. त्यामुळे स्थानकात येणाऱ्या-जाणाऱ्या बसला अडथळा निर्माण होऊन अनेकदा रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळते.

पुणे, नाशिक, मुंबई या बड्या शहरांच्या मध्यावर संगमनेर असल्याने येथे नेहमीच वर्दळ असते. पूर्वीच्या तुलनेत सर्वच प्रकारच्या वाहनांची संख्या वाढली आहे. वाहनतळासंदर्भात संगमनेर नगर परिषदेकडून धोरण ठरविले गेले नसल्याने वाहन चालक जागा मिळेल तेथे आपली वाहने उभी करतात. परिणामी अनेक ठिकाणी वाहतुकीची मोठी कोंडी झालेली पाहायला मिळते. पार्किंगची समस्या शहरात अनेक ठिकाणी सारखीच आहे.

नव्याने संगमनेर बसस्थानक आणि व्यापारी संकुल बांधण्यात आले. व्यापारी संकुलासमोर काही प्रमाणात वाहने उभी राहतील, अशी पार्किंगची सोय आहे. मात्र, तरीही बसस्थानकाच्या आवारात मोठ्या संख्येने खासगी दुचाकी, चारचाकी वाहने नेहमीच उभी असतात. अनेक वाहनचालक आपली वाहने बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ उभी करतात. त्यामुळे स्थानकात जाणाऱ्या अथवा बाहेर पडणाऱ्या बसला अडथळा होतो. बसचालक हॉर्न वाजवून वैतागून जातात. अखेर चालकालाच बस मागे घेऊन वळवून नेण्याशिवाय पर्याय नसतो.

बसस्थानकाच्या दुसऱ्या प्रवेशद्वाराजवळ भुयारी पार्किंगची सोय उपलब्ध आहे. परंतु नियोजनाचा अभाव असल्याने पार्किंग असूनही त्याचा वापर होत नाही. येथे पार्किंग सुरू केल्यास रस्त्यांवर उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांमुळे होणाऱ्या वाहनकोंडीचा प्रश्न सुटू शकतो. त्यासाठी तातडीने प्रयत्न करणे गरजेचे आहे.

-------------------

बसस्थानकाच्या आवारात, प्रवेशद्वारासमोर मोठ्या संख्येने दुचाकी, चारचाकी वाहने उभी करणाऱ्यांना प्रतिबंध करण्यासाठी संगमनेर आगारातील व्यक्तीची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, खासगी वाहन चालक या व्यक्तीला जुमानत नाहीत. काही जण त्याच्याशी वाद घालतात. दहा मिनिटांत जाऊन येतो. असे सांगत स्थानकाच्या आवारात अनेक जण आपली वाहने उभी करून निघून जातात.

--------------

संगमनेर बसस्थानक परिसरातील पार्किंग व्यवस्था अत्यंत अपुरी असल्याने वाहनांची कोंडी होते. अकोले रस्त्याला असलेल्या दुसऱ्या बाजूच्या प्रवेशद्वाराजवळ असलेली भुयारी पार्किंग सुरू करावी. त्यामुळे पार्किंगची समस्या काही प्रमाणात सुटेल व नागरिकांनाही त्याचा फायदा होईल.

कुलदीप ठाकूर, जिल्हा संयोजक, बजरंग दल

..........

star 1102star 1102