श्रीरामपूर-राहुरी महामार्गावर प्रवरा नदीच्या पुलावर एक मोटारसायकल उभी होती. त्यामुळे काही लोकांना संशय आला. एक मृतदेह पाण्यात तरंगलेला दिसून आला. बेलापूरचे उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी पोलीस दूरक्षेत्र येथे मृतदेहप्रकरणी खबर दिली. हवालदार अतुल लोटके, माजी सरपंच भरत साळुंके यांनी नदीपात्रात जाऊन पाहणी केली.
पोलिसांनी गणेश आल्हाट, नितीन जगताप, दिनेश शेलार, विश्वास बागुल, सुरेश छल्लारे या पोहणाऱ्या तरुणांच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. पुलावर असलेल्या मोटारसायकल (एमएचएच १७ एएल ५१९८)ला लावलेल्या पिशवीत खराब भाजीपाला, वजन काटे, ओळखपत्र मिळाले. त्यावरून नातेवाइकांचा तपास लागला. त्यानंतर मृतदेहाची ओळख पटली.
मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. पोलीस हवालदार अतुल लोटके पुढील तपास करत आहेत.
---