भाजपकडून सहकार मोडीत काढण्याचे काम : एच. के. पाटील यांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 15:32 IST2020-10-15T15:30:44+5:302020-10-15T15:32:38+5:30
भारतीय जनता पक्ष सहकाराला मोडीत काढण्याचे काम करत आहे. केंद्र सरकारने नवे कृषी विधेयक संसदेत मंजूर केले. या विधेयकामुळे शेतकरीच कोलमडून पडणार आहे.

भाजपकडून सहकार मोडीत काढण्याचे काम : एच. के. पाटील यांची टीका
संगमनेर (जि. अहमदनगर) : देशाचे पंतप्रधान नरेंद मोदी 'मन की बात' करतात तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात 'दिल की बात' करतात. काँग्रेसने आजवर शेतकरी हिताचे निर्णय घेतले आहेत. मात्र, भारतीय जनता पक्ष सहकाराला मोडीत काढण्याचे काम करत आहे. केंद्र सरकारने नवे कृषी विधेयक संसदेत मंजूर केले. या विधेयकामुळे शेतकरीच कोलमडून पडणार आहे, अशी टीका काँग्रेसचे कर्नाटकातील नेते व महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांनी केले.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या ५४ व्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ गुरूवारी झाला. यावेळी ते बोलत होते. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, खासदार राजीव सातव, आमदार डॉ. सुधीर तांबे, लहू कानडे, थोरात सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ आदी उपस्थित होते.