श्रीगोंदा : श्रीगोंदा येथील जिल्हा सहकारी बँकेच्या आवारात पैसे वाटपाच्या संशयावरून भाजपा व राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्ते समोरासमोर भिडले. दगडफेकीत सीताराब डेबरे हा होमगार्ड गंभीर जखमी झाला आहे. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा बँक शाखेला सील ठोकले. ही घटना सोमवारी रात्री उशीरा घडली. या प्रकरणी पोलिसांनी ४० ते ५० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. समजलेली अधिक माहिती अशी की, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक कुंडलिकराव जगताप हे प्रचार आटोपून आराम करण्यासाठी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास बँकेच्या विश्रामगृहात गेले. त्याठिकाणी हरिदास शिर्के, बाळासाहेब मनसुके, आसीफ इनामदार, राहुल सुपेकर, धनंजय कोथिंबिरे आदी कार्यकर्ते जमले. जिल्हा सहकारी बँकेतून पैसे काढून मतदारांना वाटले जातात असा संशय भाजपाच्या कार्यकर्त्यांना आला. त्यांनी माहिती भाजपाचे उमेदवार बबनराव पाचपुते, इतर २० कार्यकर्त्यांनी बँकेच्या विश्रामगृहाकडे धाव घेतली. बघता बघता मोठा जनसमुदाय बँकेच्या आवारात जमा झाला. यामुळे वातावरणात तणाव निर्माण झाला. पोलिसांनी जमाव पांगविण्यासाठी लाठीमार केला. तहसीलदार डॉ. विनोद भामरे, पोलीस उपअधीक्षक धीरज पाटील घटनेची चौकशी करुन माहिती घेतली. या दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून बँकेला सील ठोकले. याप्रकरणी भाजपाचे गणेश श्रीराम, स्वप्नील खेत्रे, राष्ट्रवादीचे भाऊसाहेब दातीर, अनिकेत जगताप यांना पोलिसांनी अटक केली. बबनराव पाचपुते, कुंडलिकराव जगताप, अॅड. विठ्ठलराव काकडे, बाळासाहेब महाडिक, प्रमोद जगताप, बंडू धारकर, देवीदास थोरात, नंदकुमार कोकाटे, मिलिंद दरेकर, गणेश श्रीराम, सचिन भोसले, अनिकेत जगताप, नितीन शिंदे, एम. डी. शिंदे, स्वप्नील खेत्रे, भरत नाहाटा, प्रा. दरेकर, डॉ. भाऊसाहेब होले, सुदर्शन पाचपुते, वसंत सकट, कुमार लोखंडे, बापूसाहेब जगताप, सुरेश भापकर, सुनील वाळके, संतोष खेतमाळीस, भाऊसाहेब दातीर, मनोज इथापे यांच्यासह ५० ते ५० जणांविरोधात भा. दं. वि. कलम १४३, १४७, १४९, ३३२, मुंबई अॅक्ट कलम ३७(१) (३) १३५ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. याबाबतची फिर्याद पोलीस हे. कॉ. परमेश्वर गायकवाड यांनी दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक के. ए. पोतदार करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)
भाजपा, राष्ट्रवादी कार्यकर्त्यांत श्रीगोंद्यात मध्यरात्री धुमश्चक्री
By admin | Updated: October 7, 2014 23:42 IST
श्रीगोंदा : श्रीगोंदा येथील जिल्हा सहकारी बँकेच्या आवारात पैसे वाटपाच्या संशयावरून भाजपा व राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्ते समोरासमोर भिडले.
भाजपा, राष्ट्रवादी कार्यकर्त्यांत श्रीगोंद्यात मध्यरात्री धुमश्चक्री
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}