काळाबाजार थांबविण्याची भाजपची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:19 IST2021-04-19T04:19:27+5:302021-04-19T04:19:27+5:30

-------------- रविवारी तुरळक संचार अहमदनगर : येथील सावेडी भागात रविवारी नागरिकांचा तुरळक संचार दिसून आला. प्रशासनाने रस्त्यावर उतरून नागरिकांना ...

BJP demands to stop black market | काळाबाजार थांबविण्याची भाजपची मागणी

काळाबाजार थांबविण्याची भाजपची मागणी

--------------

रविवारी तुरळक संचार

अहमदनगर : येथील सावेडी भागात रविवारी नागरिकांचा तुरळक संचार दिसून आला. प्रशासनाने रस्त्यावर उतरून नागरिकांना जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे रविवारी नागरिकांनीही घराबाहेर येणे टाळले. अत्यावश्यक कामांसाठी नागरिकांची तुरळक वर्दळ दिसून आले. त्यात उन्हाचा कडाका असल्याने नागरिकांनीही घराबाहेर येणे टाळले.

---------------

लसीकरणासाठी गर्दी

अहमदनगर : रविवार असला तरी लसीकरण मोहीम सुरूच होती. नगर शहरातील लसीकरण केंद्रावर नागरिकांची गर्दी होती. शहरातील नागरिकांनी जिल्हा रुग्णालयासह महापालिकेच्या केंद्रावरही हजेरी लावली होती.

------------

रेमडेसिविरची चौकशी

अहमदनगर : जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा कायम होता. अनेक रुग्णांच्या नातेवाइकांकडून इंजेक्शन कुठे मिळेल, याची सोशल मीडियावरून चौकशी केली जात होती. तसेच गत आठवड्यात प्रसिद्ध केलेली औषध विक्रेत्यांची यादी पुन्हा सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली.

Web Title: BJP demands to stop black market