शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

पक्ष्यांच्या चारा, पाण्यासाठी खुला केला ज्वारीचा मळा

By admin | Updated: January 12, 2016 23:36 IST

बाळासाहेब काकडे, श्रीगोंदा दुष्काळी स्थितीमुळे जिरायत भागातील ज्वारीचे पीक करपले आहे. चारा, पाण्याच्या शोधार्थ पक्ष्यांनी बागायती भागात धाव घेतली आहे

बाळासाहेब काकडे, श्रीगोंदा दुष्काळी स्थितीमुळे जिरायत भागातील ज्वारीचे पीक करपले आहे. चारा, पाण्याच्या शोधार्थ पक्ष्यांनी बागायती भागात धाव घेतली आहे. पक्ष्यांना चारा, पाण्याची व्यवस्था करण्यासाठी वांगदरी येथील शेतकरी प्रल्हाद निवृत्ती नागवडे यांनी आपल्या साडेतीन एकर ज्वारीच्या शेतात चार पाणवठे तयार करून ज्वारीचा मळा पक्ष्यांसाठी खुला केला आहे. ज्वारीच्या सोन्यासारख्या टपोऱ्या कणसावर ऐटीत बसून विविध प्रकारचे पक्षी ताव मारून पाणी पिण्याचा आनंद द्विगुणित करीत आहेत. श्रीगोंदा तालुक्यातील वांगदरी घोड धरणाच्या लाभ क्षेत्रातील ऊस शेतीसाठी प्रसिद्ध असलेले गाव. गेल्यावर्षी पाऊस कमी झाल्याने बहुतेक शेतकऱ्यांनी ज्वारी,गव्हाच्या पिकांकडे मोर्चा वळविला आहे. प्रल्हाद नागवडे यांनी नऊ एकर शेतीपैकी साडेतीन एकर क्षेत्रात ज्वारीची पेरणी करुन ज्वारी पिकास खतपाणी घातले. त्यामुळे जोंधळ्याला चांदणे लगडले. दुष्काळीस्थितीमुळे जिरायत भागातील विविध प्रकारचे पक्षी तहानभूक भागविण्यासाठी घोडच्या पट्टयात आले आहेत. प्रल्हाद नागवडे व त्यांचा मुलगा अविनाश नागवडे यांनी अर्थकारण व स्वत:च्या कुटुंबाचा विचार न करता ज्वारीचा मळा पक्ष्यांसाठी खुला करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पीव्हीसी पाईप कापून त्याचे पाणवठे तयार केले. विविध प्रकारचे पक्षी नागवडे यांच्या मळ्यात हक्काने येऊन भूक, तहान भागवितात, तृप्त पक्षी मंजुळ किलबिलाट करतात. पक्ष्यांचे मनोहारी दृश्य पाहून नागवडे परिवाराला आगळावेगळे समाधान मिळत आहे. अध्यात्मिक वारसा असलेले प्रल्हाद नागवडेंचे कुटुंब हा उपक्रम तीन वर्षांपासून राबवित आहे. ईश्वराच्या सेवेपेक्षा पशू, पक्ष्यांच्या सेवेतून अधिक समाधान मिळते. यात मोठा आनंद आहे. ‘पक्षी येती शेतात, आम्हा तोचि दिवाळी दसरा’. कायम दिवाळी, दसरा साजरा होण्यासाठी दरवर्षी ज्वारीचा मळा पक्ष्यांसाठी खुला करणार आहे. -प्रल्हाद नागवडे, प्रगतशील शेतकरी, वांगदरी दुष्काळ आणि पाणी टंचाईमुळे मार्च, मे महिन्यात पशुपक्ष्यांचे जीवनमान धोक्यात येणार आहे. अशा आणीबाणीच्या काळात प्रत्येकाने मानवतावादी दृष्टिकोन ठेवून पशु, पक्ष्यांसाठी पाणवठे तयार केले पाहिजेत. माणसांच्या जेवणावळी उठविण्यापेक्षा प्रल्हाद नागवडे या शेतकऱ्याचा आदर्श घेऊन उन्हाळ्याच्या सुट्टीत विद्यार्थ्यांनी पशु, पक्ष्यांसाठी चारा, पाण्याची व्यवस्था करावी. यामधून सुट्टीचा आगळावेगळा आनंद लुटावा. आपल्या परिवार,परिसरात वेगळे चैतन्य निर्माण होईल. -ज्ञानदेव म्हस्के, प्राचार्य, महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय, श्रीगोंदा.