भाजप युवा मोर्चाच्या वतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:15 IST2021-06-01T04:15:46+5:302021-06-01T04:15:46+5:30

श्रीरामपूर : मोदी सरकारने सात वर्षे वाटचाल पूर्ण केल्याने भाजप युवा मोर्चाच्या वतीने शहरात जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या उपस्थितीत ...

On behalf of BJP Youth Front | भाजप युवा मोर्चाच्या वतीने

भाजप युवा मोर्चाच्या वतीने

श्रीरामपूर : मोदी सरकारने सात वर्षे वाटचाल पूर्ण केल्याने भाजप युवा मोर्चाच्या वतीने शहरात जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या उपस्थितीत लसीकरण नावनोंदणी अभियान राबविण्यात आले. यावेळी संघटक सरचिटणीस नितीन दिनकर उपस्थित होते.

युवा मोर्चाचे विशाल अंभोरे व रूपेश हरकल यांनी या कामी पुढाकार घेतला. यावेळी जिल्हा सरचिटणीस सुनील वाणी, जिल्हा उपाध्यक्ष अशोक पवार, सतीश सौदागर, गणेश राठी, रामभाऊ तरस, युवा मोर्चाचे प्रदेश सचिव किरण बोऱ्हाडे, जिल्हा चिटणीस अनिल भनगडे, विठ्ठल राऊत, बंडूकुमार शिंदे, मिलिंदकुमार साळवे, चंद्रकांत परदेशी, अजित बाबेल, अक्षय नागरे, विजू आखाडे, रवी पंडित, आनंद बुदेकर उपस्थित होते.

तालुकाध्यक्ष बबनराव मुठे व शहराध्यक्ष मारुती बिंगले यांनी अभियानाचे उदघाटन केले. प्रभाग क्रमांक सातमधील नागरिकांची नाव नोंदणीसाठी गैरसोय होत असल्याने शिबिर घेण्यात आले. त्यास नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला, अशी माहिती अंभोरे यांनी दिली.

जिल्हाध्यक्ष गोंदकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी रमेश आजगे, दीपक इंगळे, गोविंदा कुर्‍हे, राजेंद्र बोरडे, सुनील हिंगमिरे, रमेश शेठ गुंदेचा, प्रशांत बोरा, विजू कुऱ्हे, केशव कुऱ्हे उपस्थित होते.

Web Title: On behalf of BJP Youth Front