'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 19:45 IST2026-04-13T19:43:29+5:302026-04-13T19:45:58+5:30

Pratibha Chakankar Ashok Kharat Case: अशोक खरात प्रकरणात प्रतिभा चाकणकर यांचेही नाव आले. त्यांच्या नावे समता पतसंस्थेत खाती असून, त्यावरून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याचे समोर आले. या सगळ्या प्रकरणावर प्रतिभा चाकणकर यांनी त्यांची बाजू मांडली. 

'Bank accounts in credit institutions are fake, signatures are also fake'; Pratibha Chakankar speaks for the first time on Ashok Kharat case | 'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या

'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या

Pratibha Chakankar, Ashok Kharat: अशोक खरात यांने आर्थिक व्यवहार करण्यासाठी ज्या खात्यांचा वापर केला. त्यातील एक खाते प्रतिभा चाकणकर यांचे असल्याचे तपासातून समोर आले. या खात्यावरून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले. समोर आलेल्या मुद्द्यावर प्रतिभा चाकणकर यांनी पहिल्यांदाच त्यांची बाजू मांडली. ते खाते बनावट असून, सही सुद्धा खोटी असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांचेही अशोक खरात प्रकरणात नाव आले. त्यानंतर त्यांनी सोमवारी शिर्डी पोलीस ठाण्यात येऊन पोलिसांना माहिती दिली.  

एका रुपयाचाही व्यवहार मी केलेला नाही - प्रतिभा चाकणकर

माध्यमांशी बोलताना प्रतिभा चाकणकर यांनी सांगितले की, "जे खातं आहे, ते बनावट आहे. मी तिथे सह्या केलेल्या नाहीत. एक रुपयाचाही व्यवहार त्या खात्यातून मी केलेला नाही. मीडियामध्ये पाहिलं आणि आम्ही आलो. आम्हाला अजून कोणतीही नोटीस मिळालेली नाही. कागदपत्रे बनावट आहेत. सह्या सुद्धा खोट्या आहेत. पुढचा तपास पोलीस करत आहेत." 

प्रतिभा चाकणकर यांच्या वकील जयश्री काळे-पालवे यांनी सांगितले की, "प्रसारमाध्यमांतील बातम्यांमध्ये जी माहिती प्रसारित झाली की, प्रतिभा चाकणकर यांना पोलिसांनी नोटीस पाठवली. अजूनही त्यांना ती नोटीस मिळालेली नाही."

प्रतिभा चाकणकर यांनी पोलिसांना काय दिली माहिती?

"अशोक खरात याने जी बनावट खाती काढलेली आहेत, समता पतसंस्थेची. या खात्याची माहिती देण्यासाठी प्रतिभा चाकणकर आणि तन्मयी चाकणकर उपस्थित राहिल्या. संपूर्ण प्रकरण पाहिल्यानंतर त्यांनी (प्रतिभा चाकणकर) पोलिसांना सांगितले की, समता पतसंस्थेमध्ये आम्ही कधीही गेलेलो नव्हतो. आमचे त्या ठिकाणी जाण्याचे काहीही कारण नाही. त्यांचा पत्ता चुकीचा आढळून आला", अशी माहिती वकिलांनी दिली. 

"अशोक खरात याने वारसदार म्हणून जो मोबाईल क्रमांक दिला, तो त्याचा स्वतःचा आहे. हे सर्व सिद्ध झाल्यानंतर सह्यांचे अनेक नमुने प्रतिभा चाकणकर आणि तन्मयी चाकणकर यांनी पोलिसांना दिले. सगळं टाईप करायचं असल्याने बराच वेळ लागला. सर्व खातरजमा झाल्यानंतर त्या बाहेर पडल्या. पोलिसांना त्या सहकार्य करतील आणि तपासामध्ये वेळोवेळी मदत करतील", असेही वकील जयश्री काळे-पालवे यांनी सांगितले. 

Web Title : प्रतिभा चाकणकर ने खरात मामले में जाली बैंक खातों, फर्जी हस्ताक्षरों से इनकार किया।

Web Summary : प्रतिभा चाकणकर ने अशोक खरात के वित्तीय धोखाधड़ी में शामिल होने से इनकार किया। उन्होंने दावा किया कि उनके नाम का बैंक खाता नकली है, हस्ताक्षर जाली हैं, और उन्होंने कोई लेनदेन नहीं किया। उन्होंने हस्ताक्षर नमूने देकर पुलिस को सहयोग किया।

Web Title : Pratibha Chakankar denies fraudulent bank accounts, forged signatures in Kharat case.

Web Summary : Pratibha Chakankar refuted involvement in Ashok Kharat's financial fraud. She claims the bank account bearing her name is fake, the signatures forged, and she had no transactions. She cooperated with police, providing signature samples.