शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील १९ शेतकऱ्यांना पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:15 IST

अहमदनगर : कृषी विभाग, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या संयुक्त विद्यमाने माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती कृषिदिन म्हणून ...

अहमदनगर : कृषी विभाग, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या संयुक्त विद्यमाने माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती कृषिदिन म्हणून साजरी करण्यात आली. याप्रसंगी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उत्कृष्ट शेतकरी पुुरस्कार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

कृषिदिनाचे औचित्य साधून शेतकरी पुरस्कार प्रदान सोहळा व कृषी संजीवनी सप्ताहाचा समारोप करण्यात आला. कृषी विभाग आत्माअंतर्गत नाथा देशमुख, सतीश पालवे, नवनाथ सायकर, अविनाश लहाणे, संजय वागस्कर, रामेश्‍वर जगताप, ताराचंद गागरे, बाळासाहेब खरात, शांताराम बारामते, मीनाक्षी निर्मल यांना व कृषी विभागाच्या वतीने भानुदास थोरात, पांडुरंग कर्डिले, बबन पागिरे, हरिभाऊ म्हस्के, देवीदास खाटिक, कृष्णा परदेशी, धनराज पवार, आबासाहेब वावरे, महेश म्हस्के या शेतकऱ्यांना उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार प्रदान करण्यात आला.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा घुले म्हणाल्या, वसंतराव नाईक यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सर्वांत जास्त काळ काम पाहिले. त्यांच्या कार्यकाळात कृषी विधायक धोरण, महिला शेतकऱ्यांचे सक्षमीकरण व विविध योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या. कोरडवाहू शेतीच्या विकासासाठी त्यांनी बहुमोल योगदान दिले. राज्याला अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. दूरदृष्टी असलेले कै. नाईक यांची जयंती कृषिदिन म्हणून साजरी केली जाते. कै. नाईक यांनी पाहिलेले हरितक्रांतीचे स्वप्न साकार झाले आहे, असे सांगितले. याप्रसंगी कृषी समितीचे सभापती काशिनाथ दाते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप, कृषी उपसंचालक विलास नलगे, कृषी विकास अधिकारी सुनीलकुमार राठी, तंत्र अधिकारी अशोक डमाळे, कृषी अधिकारी प्रमोद साळवे, प्रवीण गोरे, कौस्तुभ कराळे, प्रकाश महाजन आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन कांतीलाल ढवळे यांनी केले. आभार सुनीलकुमार राठी यांनी मानले.

..................०१ झेडपी पुरस्कार

उत्कृष्ट शेतकरी पुुरस्कार प्रदान करताना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले. समवेत काशिनाथ दाते, जगन्नाथ भोर, शिवाजीराव जगताप, विलास नलगे, सुनीलकुमार राठी, अशोक डमाळे, प्रमोद साळवे आदी.