खूनाचा प्रयत्न, दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 15:51 IST2021-02-08T15:51:22+5:302021-02-08T15:51:53+5:30

खूनाचा प्रयत्न, दरोड्याच्या गुन्ह्यात चार वर्षांपासून फरार असलेल्या सोनेगाव, घोडेगाव (ता.जामखेड) येथील दोन आरोपींना जामखेड पोलिसांनी सापळा रचून अटक केली.

Attempted murder, fugitive accused of robbery arrested | खूनाचा प्रयत्न, दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी जेरबंद

खूनाचा प्रयत्न, दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी जेरबंद

जामखेड : खूनाचा प्रयत्न, दरोड्याच्या गुन्ह्यात चार वर्षांपासून फरार असलेल्या सोनेगाव, घोडेगाव (ता.जामखेड) येथील दोन आरोपींना जामखेड पोलिसांनी सापळा रचून अटक केली.

पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी जगन्नाथ येडबा जाधव (रा. सोनेगाव), खूनाचा प्रयत्न या गुन्ह्यातील फरार आरोपी बाळू शिवाजी रावण (रा. घोडेगाव) जामखेड हे खर्डा (ता.जामखेड) परिसरात आले आहेत अशी माहिती खबऱ्याकडून मिळाली होती. त्यानुसार गायकवाड यांनी खर्डा पोलीस दूरक्षेत्र येथील अंमलदार शेंडे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना सूचना दिल्या. त्यांनी सापळा रचून खर्डा गावच्या शिवारातून त्या दोघांना ताब्यात घेतले.

    यातील जगन्नाथ येडबा जाधव याच्याविरुद्ध जामखेड पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल आहे. हा चार वर्षांपासून फरार होता. दुसरा आरोपी बाळू शिवाजी जाधव याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल असून तो दोन वर्षापासून फरार होता.

Web Title: Attempted murder, fugitive accused of robbery arrested