खासदार लोखंडे यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:20 IST2021-04-16T04:20:38+5:302021-04-16T04:20:38+5:30

नेवासा : तालुक्यातील कोरोना विषयक परिस्थितीची आढावा बैठक घेण्यास इतका उशीर का केला, असे म्हणत वंचितचे नेते संजय सुखदान ...

Attempt to throw ink on MP Lokhande | खासदार लोखंडे यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न

खासदार लोखंडे यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न

नेवासा : तालुक्यातील कोरोना विषयक परिस्थितीची आढावा बैठक घेण्यास इतका उशीर का केला, असे म्हणत वंचितचे नेते संजय सुखदान यांनी खासदार सदाशिव लाेखंडे यांच्या अंगावर शाई फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र लोखंडे यांचे स्वीय सहायक व पोलीस अधिकाऱ्यांनी सुखधान यांना अडविल्याने हा प्रयत्न अयशस्वी झाला.

पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या दालनात गुरुवारी कोरोनाबाबतची आढावा बैठक होती. यावेळी प्रांताधिकारी गणेश पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिराज सूर्यवंशी व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहसीन बागवान यांच्याशी लोखंडे यांनी चर्चा सुरू होती. त्यावेळी संजय सुखदान तेथे आले. कोरोनाची परिस्थिती इतकी भयावह स्थिती असताना आपण उशिरा का आलात? तालुक्यात रेमडेसिविर इंजेक्शन व ऑक्सिजनअभावी लोक मरत आहेत. याबाबत तुम्ही करताय तरी काय असा सवाल केला? यानंतर सुखदान यांनी लोखंडे यांच्या अंगावर शाई फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र लोखंडे यांचे स्वीय सहायक गांगवे व पोलीस अधिकाऱ्यांनी सुखदान यांना रोखल्याने प्रयत्न अयशस्वी झाला.

त्यानंतर तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत विषयावर पडदा टाकला.

--

१५ लोखंडे

नेवासा येथील बैठकीत खासदार सदाशिव लोखंडे यांच्या अंगावर शाई फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या संजय सुखदान यांना पोलीस अधिकाऱ्यांनी पकडले.

Web Title: Attempt to throw ink on MP Lokhande