अशोक खरातची शिर्डी विमानतळाजवळ लाखोंची जमीन

By सचिन धर्मापुरीकर | Updated: March 25, 2026 07:28 IST2026-03-25T07:28:44+5:302026-03-25T07:28:44+5:30

विशेष म्हणजे, हा व्यवहार करताना त्याने शासकीय दराप्रमाणे नव्हे तर बाजार भावाने होणाऱ्या रकमेवर मुद्रांक शुल्क भरले.

ashok kharat land worth lakhs near Shirdi airport | अशोक खरातची शिर्डी विमानतळाजवळ लाखोंची जमीन

अशोक खरातची शिर्डी विमानतळाजवळ लाखोंची जमीन

सचिन धर्मापुरीकर, लोकमत न्यूज नेटवर्क, कोपरगाव (जि. अहिल्यानगर) : नाशिकचा भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात याच्या मालमत्ता देश-विदेशात असल्याचे बोलले जात असतानाच, साईबाबा आंतरराष्ट्रीय शिर्डी विमानतळाजवळ असलेल्या काकडी गावात त्याने ३ एकर ८ गुंठे जमीन खरेदी केल्याचे समोर आले आहे. 

विशेष म्हणजे, हा व्यवहार करताना त्याने शासकीय दराप्रमाणे नव्हे तर बाजार भावाने होणाऱ्या रकमेवर मुद्रांक शुल्क भरले. काळा पैसा पांढरा करण्यासाठीचा हा त्याचा उद्योग होता, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

कॅप्टन अशोक खरात याने  आपल्या भोंदूगिरीतून अनेकांची आर्थिक फसवणूक केली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मालमत्ता जमविल्या आहेत. कोपरगाव तालुक्यातील काकडी येथे असलेल्या साईबाबा इंटरनॅशनल एअरपोर्टजवळ त्याने ११  जून २०२४ मध्ये ६४ लाख ४० हजार रुपयांत जमीन खरेदी केली. 

राजेंद्र  कोते, विजय  कोते व जाकी अलमचंदानी यांच्याकडून ही जमीन खरेदी करण्यात आली. साठे  खतात दस्तऐवज करून घेणाऱ्या पक्षकाराचे नाव अशोककुमार खरात असे नमूद आहे. कोपरगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्त क्रमांक ३२५३/२०२४ नुसार खरात याने ३०,००० रुपये नोंदणी शुल्क आणि मुद्रांक शुल्क ३ लाख ८६ हजार ४०० रुपये भरले. या क्षेत्राचे सरकारी मूल्य कमी होते.
 

Web Title : अशोक खरात की शिरडी हवाई अड्डे के पास लाखों की जमीन

Web Summary : स्वयंभू बाबा अशोक खरात ने शिरडी हवाई अड्डे के पास 64.4 लाख रुपये में जमीन खरीदी। बाजार मूल्य के आधार पर स्टाम्प शुल्क का भुगतान करने से मनी लॉन्ड्रिंग का संदेह होता है। खरात पर वित्तीय धोखाधड़ी का आरोप है।

Web Title : Ashok Kharat's Lakhs Worth of Land Near Shirdi Airport

Web Summary : Self-proclaimed godman Ashok Kharat bought land near Shirdi Airport for ₹64.4 lakhs. He paid stamp duty based on market value, raising suspicions of money laundering. Kharat is accused of financial fraud.