शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

कारागिरांनी पळवले सराफ दुकानदारांचे १ कोटीचे सोने; सराफ बाजारातील प्रकार, सहाजणांविरोधात कोतवालीत फिर्याद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 23:55 IST

संबंधित कारागीर सोन्याचे दागिने घेऊन पसार झाल्याचे लक्षात आल्याने देडगावकर यांनी दीपनकर माजी, सोमीन बेरा कार्तिक, सोमनाथ सामंता, आन्मेश दुलोई, सत्तू बेरा, स्नेहा बेरा यांच्या विरोधात सोने चोरून नेल्याची फिर्याद दिली.

अहिल्यानगर : दागिने बनविण्यासाठी सराफ दुकानात कामाला असलेल्या कारागिरांनी सराफांचे तब्बल १ कोटीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याचा प्रकार सराफ बाजारात घडला. याप्रकरणी सहा कारागिरांविरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे. कृष्णा जगदीश देडगावकर (३२) यांनी फिर्याद दिली. त्यांचे सराफ बाजारात जगदीश लक्ष्मण देडगावकर नावाने तसेच त्यांचा भाऊ प्रतीक याचे ए. जे. देडगावकर नावाने ज्वेलर्सचे दुकान आहे. या दुकानाच्या तळ मजल्यावर सोन्याचे दागिने बनवणारे कारागीर दीपनकर माजी, सोमीन बेरा (कार्तिक), सत्तु बेरा, स्नेहा बेरा हे काम करत होते. तसेच सोमनाथ सामंता व अन्मेश दुलाई हे दोन कारागीर त्यांच्या दुकानासमोरील विजय जगदाळे याच्या सराफ दुकानात कारागीर म्हणून काम करत होते. हे सोनार त्यांना सोने देऊन त्यांच्याकडून सोन्याचे दागिने बनवून घेत होते.

दि. २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी देडगावकर हे दुकानाच्या तळ मजल्यावर गेले असता त्यांना संबंधित कारागीर तेथे आढळले नाहीत. त्यांनी फोन करून संपर्क करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही. काही वेळाने जगदाळे यांना फोन करून त्यांच्या दुकानातील कारागीर आहेत का, याची खात्री केली; परंतु तेही फरार होते. त्यावरून संबंधित कारागीर सोन्याचे दागिने घेऊन पसार झाल्याचे लक्षात आल्याने देडगावकर यांनी दीपनकर माजी, सोमीन बेरा कार्तिक, सोमनाथ सामंता, आन्मेश दुलोई, सत्तू बेरा, स्नेहा बेरा यांच्या विरोधात सोने चोरून नेल्याची फिर्याद दिली.चोरी गेलेले सोने असे

१) २७.७५ लाखांचे कृष्णा देडगावकर यांचे २६५ ग्रॅम चोख सोने व दुरुस्तीसाठी दिलेले त्यांच्या पत्नीचे २९० ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण, बांगड्या व पेशवाई हार.

२) ३२.५० लाखांचे विजय राजाराम जगदाळे यांचे ६५० ग्रॅम चोख सोने३) ४.६५ लाखांचे सागर संजय गुरव यांचे ९३ ग्रॅम वजनाचा दुरुस्तीसाठी दिलेला सोन्याचा नेकलेस४) १३ लाखांचे प्रतीक जगदीश देडगावकर यांचे ८० ग्रॅम वजनाचे दुरुस्तीसाठी दिलेले कानातले व नेकलेस, तसेच १८० ग्रॅम चोख सोने.

५) ८५ हजारांची भरत दगडूशेठ शिराळकर यांचे १७ ग्रॅम वजनाची लगड.६) ७ लाखांचे बरजहान सुलेमान शेख याचे १४० ग्रॅम वजनाचे चोख सोने व दागिने.

७) १४.२५ लाखांचे प्रमोद आबासाहेब गाडगे यांचे २८५ ग्रॅम वजनाचे चोख सोने.८) १.०५ लाखांचे इम्रान आशरफ आली यांचे २१ ग्रॅम वजनाचे चोख सोने.

असे एकूण १ कोटी १ लाख ५ हजार रुपये किमतीचे २ हजार २१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, चोख व लगड चोरीला गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Craftsmen Flee with Gold Worth ₹1 Crore from Jeweler Shop

Web Summary : Six artisans allegedly stole gold jewelry worth ₹1 crore from a jeweler in the Sarafa market. A complaint has been filed with the Kotwali police. The stolen gold includes items given for repairs.