मराठा आरक्षणाला सर्वपक्षीय नगरसेवकांचा पाठिंबा

By अण्णा नवथर | Updated: October 28, 2023 14:59 IST2023-10-28T14:57:39+5:302023-10-28T14:59:06+5:30

आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी अंतर्वली सराटी येथे येथे उपोषण सुरू केले आहे.

All party corporators support Maratha reservation | मराठा आरक्षणाला सर्वपक्षीय नगरसेवकांचा पाठिंबा

मराठा आरक्षणाला सर्वपक्षीय नगरसेवकांचा पाठिंबा

अहमदनगर: मराठा आरक्षणासाठी सुरू करण्यात आलेल्या साखळी उपोषणाला भेट देत नगर शहरातील सर्वपक्षीय नगरसेवकांनी आरक्षणाला शनिवारी पाठिंबा दिला.

आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी अंतर्वली सराटी येथे येथे उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला पाठिंबा म्हणून अहमदनगर सकल मराठा समाजाच्या वतीने नगर तहसील कार्यालय समोर साखळी उपोषण करण्यात आले आहे या उपोषणाला नगर शहराचे आमदार संग्राम जगताप ,माजी महापौर भगवान फुलसौंदर, शीला शिंदे विरोधी पक्षनेते संपत बारस्कर , नगरसेवक कुमार वाकळे ,विनीत पाऊलभबुधे, बाळासाहेब पवार , शिवसेनेचे शहप्रमुख संभाजी कदम, भाजपचे नगरसेवक रवींद्र बारस्कर, अविनाश घुले आदी नगरसेवकांनी शनिवारी दुपारी भेट दिली तसेच मराठा आरक्षणाला आपला पाठिंबा असल्याचे यावेळी जाहीर केले.
 

Web Title: All party corporators support Maratha reservation