अहमदनगर अहमदनगर मध्ये मराठा आंदोलनाला भाजपचा पाठिंबा
By अण्णा नवथर | Updated: October 25, 2023 14:58 IST2023-10-25T14:58:11+5:302023-10-25T14:58:58+5:30
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळाले पाहिजे, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारपासून अंतरवाली सराटी गावात उपोषण सुरू केले आहे.

उपोषण स्थळी भेट देताना अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष महेंद्र गंधे
अहमदनगर: मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे केलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून अहमदनगर येथे सुरू करण्यात आलेल्या मराठा समाजाच्या साखळी उपोषणाला भाजपचे अहमदनगर शहर विधानसभा अध्यक्ष महेंद्र गंधे यांनी भेट देऊन पाठिंबा दिला.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळाले पाहिजे, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारपासून अंतरवाली सराटी गावात उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला पाठिंबा म्हणून अहमदनगर सकल मराठा समाजाच्या वतीने नगर शहरातील तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष महेंद्र गंधे व ओबीसी सेलचे शहराध्यक्ष ज्ञानेश्वर काळे यांनी दुपारी दीड वाजता भेट दिली.