अहमदनगर : विठ्ठल भक्तांवर काळाचा घाला, भीषण अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2018 09:42 IST2018-07-22T09:15:37+5:302018-07-22T09:42:04+5:30

कर्जत तालुक्यातील निमगाव डाकू शिवारात रविवारी (22 जुलै) पहाटे भीषण अपघात झाला आहे.

Ahmadnagar: Five people died in road accident | अहमदनगर : विठ्ठल भक्तांवर काळाचा घाला, भीषण अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू 

अहमदनगर : विठ्ठल भक्तांवर काळाचा घाला, भीषण अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू 

अहमदनगर - कर्जत तालुक्यातील निमगाव डाकू शिवारात रविवारी (22 जुलै) पहाटे भीषण अपघात झाला आहे. पंढरपूर दर्शन घेऊन घराच्या दिशेनं प्रवास करणाऱ्या भाविकांवर काळानं घाला घातला आहे. अहमदनगर-सोलापूर महामार्गावर माहिजळगावजवळील पाटेवाडी फाटा परिसरात  ट्रक आणि स्कॉर्पिओचा भीषण अपघात झाला.  या दुर्घटनेत ट्रकनं दिलेल्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

द्रुपदा भाऊसाहेब कातोरे, रमेश भाऊसाहेब कातोरे, बाळासाहेब माळवदे यांचे सह आणखी दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सत्यम कातोरे (वय 16 वर्ष)  जखमी झाला असून त्याला जामखेड येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे. हे सर्वजण खरवंडी, नेवासा तालुका येथील रहिवाशी आहेत. मृत्युमुख पडलेले रमेश कातोरे हे शिक्षक होते. कातोरे यांच्या आईला पंढरपूर वारीदरम्यान हृदयविकाराचा त्रास होऊ लागला.  म्हणून त्यांना घेऊन जाण्यासाठी हे सर्वजण पंढरपुरात दाखल झाले होते. पंढरपुरातील दर्शन झाल्यानंतर सर्वजण घराच्या दिशेनं प्रवास करण्यास निघाले. मात्र रविवारी पहाटे दुर्दैवी अपघातात 5 जणांचा मृत्यू  झाला. 


 

Web Title: Ahmadnagar: Five people died in road accident