शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
2
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
3
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
4
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
5
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
6
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
9
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
10
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
12
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
13
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
14
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
15
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
16
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
17
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
18
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
19
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
20
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न

Ahilyanagar Crime: अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 06:44 IST

Ahilyanagar School Student Murder: शहरातील एका शाळेत दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत मयत विद्यार्थ्याचे वडिलांनी तोफखाना पोलिसात फिर्याद दिली.

Ahilyanagar Crime: घरासमोर क्रिकेट खेळण्यावरून झालेल्या वादाच्या रागातून आठवीत शिकणाऱ्या मुलाने शाळेत मधल्या सुटीत दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकूने वार करून त्याचा खून केल्याची घटना घडली आहे. 

शहरातील एका शाळेत दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत मयत विद्यार्थ्याचे वडिलांनी तोफखाना पोलिसात फिर्याद दिली. त्यांचा मुलगा दहावीत शिकत होता. बुधवारी सकाळी दहावीची बोर्डाची पुरवणी परीक्षा होती. शाळा दुपारी भरली. मधल्या सुटीत मुले खेळत होती. 

काही डबा खात होती. त्यावेळी आठवीतील विद्यार्थ्याने शाळेच्या पोर्चमध्ये दहावीच्या विद्यार्थ्याच्या पोट व डोक्यावर चाकूने वार केले. त्यामुळे तो रक्तबंबाळ झाला. त्याला शाळेतील शिक्षकांनी तातडीने दुचाकीवर जिल्हा रुग्णालयात हलवले. मात्र, उपचारापूर्वीच तो मयत झाला. दोन्ही विद्यार्थी अल्पवयीन असल्याने दोघांची नावे घेतलेली नाहीत. 

अल्पवयीन आरोपी व त्याच्या मित्राला पोलिसांनी ताब्यात घेतले. घटनेनंतर तो शाळेतच थांबून होता. त्याचे पालकही शाळेत आले होते. नंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

जु्न्या भांडणाचे कारण

मयताच्या वडिलांनी फिर्यादीत म्हटले आहे की, आपला मुलगा आपल्या सासूच्या घरासमोर क्रिकेट खेळण्यासाठी जात होता. त्यावरून त्या परिसरातील एक कुटुंब हे नेहमी घरी भांडणासाठी येत होते. 

‘तुमच्या मुलाला समजावून सांगा; अन्यथा आम्ही त्याला जीवंत सोडणार नाही,’ अशा धमक्या ते देत होते. याबाबत आपल्या बहिणीने तोफखाना पोलिस स्टेशनमध्ये २०२४ मध्ये या कुटुंबाविरोधात तक्रारही दिली होती. या जुन्या भांडणाच्या कारणावरून हा खून झाला आहे.

अभ्यासात होता हुशार

मयत मुलगा हा शाळेत अभ्यासात चांगला होता. तो खेळांत ही सहभागी असायचा. तो बुद्धिबळ ही खेळायचा असे शिक्षकांनी सांगितले. घटनेनंतर शिक्षक व संस्थाचालक ही घाबरुन गेले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAhilyanagarअहिल्यानगरStudentविद्यार्थीPoliceपोलिसSchoolशाळा