शहरं
Join us  
Trending Stories
1
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
2
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
3
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
4
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
5
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
6
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
7
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
8
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
9
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
10
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
11
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
12
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
13
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
14
‘न्याय द्या, तरच भेटीला या’, हा ‘हॅशटॅग’ बनला तर?
15
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
16
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
17
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
18
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
19
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
20
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
Daily Top 2Weekly Top 5

३९ अर्ज बाद, ४ प्रलंबित

By admin | Updated: September 30, 2014 01:29 IST

अहमदनगर: विधानसभा निवडणुकीसाठी बारा मतदारसंघात ३१६ अर्ज दाखल झाले होते़ यापैकी ३९ अर्ज बाद झाले असून, शहर मतदारसंघातील ४ अर्जांवर मंगळवारी सुनावणी होणार आहे़

अहमदनगर: विधानसभा निवडणुकीसाठी बारा मतदारसंघात ३१६ अर्ज दाखल झाले होते़ यापैकी ३९ अर्ज बाद झाले असून, शहर मतदारसंघातील ४ अर्जांवर मंगळवारी सुनावणी होणार आहे़ अर्ज माघारीसाठी बुधवारी दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत आहे़विधानसभा निवडणुकीसाठी बारा मतदारसंघात ३१६ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते़ नगर शहर मतदारसंघासह बारा मतदारसंघात निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे़ निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत प्राप्त झालेल्या उमेदवारांची अर्जांची छाननी करण्यात आली़ यावेळी उमेदवारांकडून सादर करण्यात आलेल्या अर्जांची छाननी करण्यात आली असून,नगर शहर मतदारसंघातील चार अर्जांवर सेनेचे आ़ अनिल राठोड यांच्याकडून आक्षेप घेण्यात आला़ अपक्ष चार उमेदवारांच्या प्रस्तावकाच्या स्वाक्षऱ्या बनावट असल्याची तक्रार राठोड यांनी केली आहे़ या चार अपक्ष उमेदवारांच्या अर्जाची संक्षिप्त चौकशी करून मंगळवारी सुनावणी होणार आहे़उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आवश्यक असलेली प्रमाणपत्र काहींनी दाखल केली नाहीत़ त्यामुळे अपक्षांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत़ सर्वाधिक अर्ज पक्षाचा एबी फॉर्म नसल्याने बाद झाले आहेत़ पक्षाच्या वतीने दाखल केलेले त्यांचे अर्ज बाद झाले आहेत़ परंतु त्यांचे अपक्ष अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत़ राहुरी मतदारसंघातून प्रसाद तनपुरे यांचा सेनेतर्फे दाखल केलेला अर्ज बाद करण्यात आला आहे़ अकोले (१० पैकी २ बाद), संगमनेर ( १६ पैकी ३ बाद), शिर्डी ( २३ पैकी ६ बाद), कोपरगाव ( २७ पैकी ३ बाद), श्रीरामपूर- ( ४७ पैकी १ बाद), नेवासा ( २५ पैकी ४ बाद), शेवगाव-( ३६ पैकी ५ बाद), राहुरी ( २३ पैकी ३ बाद), पारनेर ( २३ पैकी २ बाद), नगर शहर ( १९ पैकी ३ बाद, चार निर्णय राखीव),श्रीगोंदा ( २९ पैकी ५ बाद), कर्जत- जामखेड ( २९ पैकी ३ बाद)़ (प्रतिनिधी)