शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
3
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
4
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
5
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
6
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
7
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
8
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
9
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
10
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
11
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
12
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
13
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
14
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
15
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
16
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
17
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
19
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
20
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

लाभार्थ्यांची यादी न लावणार्‍यांवर कारवाई

By admin | Updated: June 3, 2014 00:26 IST

अहमदनगर : अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अन्नधान्य घेऊन जाणार्‍या लाभार्थ्यांची यादी स्वस्त धान्य दुकानदारांनी दर महिन्याला लावणे बंधनकारक आहे.

अहमदनगर : अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अन्नधान्य घेऊन जाणार्‍या लाभार्थ्यांची यादी स्वस्त धान्य दुकानदारांनी दर महिन्याला लावणे बंधनकारक आहे. ती यादी न लावणार्‍या दुकानदारांवर कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी दिला. जिल्हास्तरीय दक्षता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी सोपान कासार, जिल्हा उपनिबंधक दिगंबर हौसारे, प्रकाश भोसले, राजाराम जठार, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कवडे यांनी प्रारंभी जिल्ह्यातील पुरवठा विभागाचा आढावा घेतला. अन्न सुरक्षा योजनेंतर्गत शहरी आणि ग्रामीण भागात लाभार्थी निवडण्याच्या कामाला गती देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. अन्न सुरक्षा योजना ही गरिबांच्या तोंडी घास पडावा, या सद्हेतूने सुरु करण्यात आली आहे. तथापि, यामध्ये आर्थिकदृष्ट्या संपन्न लोकांची नावे असल्याच्या तक्रारी आहेत. वास्तविक या योजनेतील लाभार्थी ग्रामसभेने निवडलेले असतात. गावातील लोकांना कोण गरीब आहेत, कोण श्रीमंत आहे, हे माहिती असते, असे असतांना खरे लाभार्थी वंचित राहून खोट्या लाभार्थींची नावे समाविष्ट होणे चुकीचे आहे. गावकर्‍यांनी असे खोटे लाभार्थी यादीतून वगळण्याची कार्यवाही करावी, असे आवाहनही त्यांनी केले. अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अन्नधान्य सवलतीच्या दरात मिळते, असे अन्नधान्य घेऊन जाणार्‍या लाभार्थींची यादी स्वस्त धान्य दुकानदारांनी सूचना फलकावर लावावी, अशी यादी न लावल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. या कामी ज्या यंत्रणांवर जबाबदारी आहे, त्यांनीही दक्षता घेणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी कवडे यांनी स्पष्ट केले. गावाच्या प्रश्नाबाबत जागरुक असायला हवे, असेही कवडे म्हणाले. दारिद््रयरेषेखालील लाभार्थी, वैयक्तिक योजनांचे लाभार्थी निवडीबाबत नियमाप्रमाणे कार्यवाही न करता काहीवेळेस बेकायदेशीररित्या निवड होते, गावकर्‍यांनी अशा बेकायदेशीर कृत्याला पाठिंबा देता कामा नये असे आवाहनही त्यांनी केले. जिल्हा पुरवठा अधिकारी सोपान कासार यांनी पुरवठा विभागाची माहिती सादर केली. जिल्ह्यात १६३१ स्वस्त धान्य दुकाने, २२४१ किरकोळ केरोसिन परवानाधारक, ३६ केरोसिन घाऊक परवानाधारक कार्यरत आहेत. जिल्ह्यात ४० गॅस एजन्सी आहेत. जिल्ह्यात अन्न सुरक्षा योजनेंतर्गत एकूण ३१ लाख ९५ हजार ६५१ लाभार्थ्यांची निवड करावयाची आहे. ३० लाख ५१ हजार १२५ लाभार्थी निवडण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)