शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
3
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
4
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
5
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
6
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
7
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
8
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
9
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
10
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
11
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
12
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
13
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
14
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
15
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
16
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
17
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
18
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
19
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
20
पंतप्रधान, मंत्री, नेते अधिकारी, सर्वांच्याच मालमत्तेची होणार चौकशी, नेपाळमध्ये बालेन शाहांचा मास्टरस्ट्रोक
Daily Top 2Weekly Top 5

वाळू माफीयांविरोधात कारवाईची मोहीम

By admin | Updated: October 29, 2014 23:57 IST

अहमदनगर: जिल्ह्यातील वाळू माफीयांविरोधात प्रशासनाने कडक पावले उचलली असून, महिनाभरात अवैध वाळू उपसा करणाऱ्या २२ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे़

अहमदनगर: जिल्ह्यातील वाळू माफीयांविरोधात प्रशासनाने कडक पावले उचलली असून, महिनाभरात अवैध वाळू उपसा करणाऱ्या २२ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे़ इतर गौण खणिज चोरी प्रकरणी आठ वाहनांवरही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे़जिल्ह्यातील वाळूचे लिलाव अद्याप झालेले नाहीत़ याविषयीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने महसूल खात्याकडे पाठविला आहे़ मात्र त्यास अद्याप मंजुरी मिळालेली नाही़ नदीपात्रातून वाळू उपसा करण्यास बंदी आहे़ असे असले तरी नियम धाब्यावर बसवून सर्रास वाळू उपसा सुरू आहे़ नदीपात्रात वाहने उतरवून वाळू उपसा होत असल्याचे प्रकार उघडकीस आले़ नदी पात्र परिसरातील नागरिकांनी ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली़ त्यामुळे जिल्हा प्रशासनाने वाळू माफीयांविरोधात कडक मोहीम हाती घेतली आहे़ प्रशासनाच्या अहवालानुसार गत सप्टेंबर अखेर जिल्ह्यातील विविध ठिकाणी छापे टाकून २२ वाहने पकडण्यात आली आहेत़ प्रशासनाने पकडलेल्या वाहनांची संख्या ४५१ झाली़ इतर मुरुम व खडीचे डंपरही पकडण्यात आले असून, दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे़ त्यामुळे वाळू चोरी प्रकरणांना आळा बसला असल्याचे प्रशासकीय सूत्रांकडून सांगण्यात आले आहे़नदी पात्रातील वाळू उपसून ती शहरात आणून विकली जात आहे़ वाळू चोरी करणारे मोठे रॅकेटच जिल्ह्यात कार्यरत आहेत़ नदी पात्र कोरडे पडले आहेत़ त्यामुळे वाळूचा सर्रास उपसा केला जात आहे़ ही वाळू शहरात आणून विकली जाते़ मात्र याकडे पोलीस प्रशासनाचेही दुर्लक्ष झाले आहे़ वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस खात्यास करण्यात आल्या़ परंतु त्याचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही़ विधानसभा निवडणुकीतून मोकळीक मिळाल्याने जिल्हा प्रशासनानेच कारवाईची मोहीम उघडली असून, चालू महिन्यांत जिल्हाभर कारवाई करण्यात आली आहे़या पुढील काळात कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांकडून सांगण्यात आले़(प्रतिनिधी)