याबाबत सोमवारी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन देण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष काजलगुरू बाबू नायर नगरवाले यांच्यासह तृतीयपंथी उपस्थित होते. या निवेदनात म्हटले आहे की, खुनाच्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केेलेल्या चार आरोपींपैकी एकाला दोन मुले आहेत तर इतर तीन जण हे चोरटे आहेत. या घटनेमुळे खऱ्या तृतीयपंथीयांना दान, धर्म मिळणे बंद झाले आहे. आम्ही कुठे लग्न, समारंभात गेलो तर लोक हाकलून देतात. यामुळे आम्हाला समाजात वावरताना अडचणी निर्माण होत आहेत. या घटनेची पूर्ण चौकशी करून या आरोपींना पुरुष म्हणून घोषित करावे. तसेच या गुन्ह्यातून तृतीयपंथी हा शब्द काढून टाकावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
फोटो २० निवेदन
ओळी- राहाता पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटक केलेले आरोपी तृतीयपंथी नसल्याबाबत संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.