नाशिक-पुणे महामार्गावर अपघात : दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 11:52 IST2019-06-20T11:48:49+5:302019-06-20T11:52:13+5:30

नाशिक-पुणे महामार्गावर बोटा शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वर जागीच ठार झाला.

Accident on Nashik-Pune highway: Two-wheeler killed | नाशिक-पुणे महामार्गावर अपघात : दुचाकीस्वार ठार

नाशिक-पुणे महामार्गावर अपघात : दुचाकीस्वार ठार

घारगाव : नाशिक-पुणे महामार्गावर बोटा शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वर जागीच ठार झाला. ही घटना बुधवारी ( १९ जून) रात्री सव्वा दहा वाजलेच्या सुमारास घडली. प्रकाश बबन केदार ( वय-३५, रा. साकुर, ता.संगमनेर) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
घारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश केदार हा दुचाकीवरून (एम. एच. ४१ एम. ४१५५) नाशिक-पुणे महामार्गावरून पुण्याकडून नाशिककडे जात असताना संगमनेर तालुक्यातील बोटा शिवारात बुधवारी रात्री सव्वा दहा वाजलेच्या सुमारास आला असता दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तो जागीच ठार झाला. घटनेची माहिती मिळताच घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे यांसह पोलीस कॉन्स्टेबल किशोर लाड, संतोष खैरे, प्रमोद चव्हाण, नामदेव बिरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आला.

 

Web Title: Accident on Nashik-Pune highway: Two-wheeler killed